Jalgaon Accident : कब्बडीचे सामने पाहायला गेलेल्या तरुणांची गाडी उलटली! तिघांवर काळाचा घाला

पिकअप गाडी पलटी झाल्याने हा अपघात झाला. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून एकूण 8 जण जखमी झालेत. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या तीन मृत तरुणांमध्ये चोपडा तालुक्यातील तरुणांचा समावेश आहे.

Jalgaon Accident : कब्बडीचे सामने पाहायला गेलेल्या तरुणांची गाडी उलटली! तिघांवर काळाचा घाला
भीषण अपघातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 30, 2022 | 1:23 PM

जळगाव : कब्बडी सामने पाहायला गेलेल्या पाच मित्रांच्या वाहनाचा भीषण अपघात (Jalgaon Road accident) झाला. या अपघातामध्ये पाचपेकी दोघा मित्रांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाची प्राणज्योत उपचारादरम्यान मालवली. दरम्यान, अन्य दोघे जण गंभीर जखमी असून त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहे. सोमवारी रात्री उशिरा हा अपघात घडला. पाच मित्र पिकअप वाहनाने (Pick up Van overturns) गेले होते. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातून सामने पाहायला हे पाचही जण जात होते. मात्र वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला. जळगावच्या चोपडा तालुक्यात (Chopda Taluka) वैजापूर येथील कबड्डी स्पर्धा बसण्यासाठी ते गेले. या मुलांच्या अपघाती मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तण आपल्यासोबत अन्य तिघे मित्र ठार झाल्यानं बचावलेल्या अन्य दोन जखमींच्या मनावरदेखील मोठा आघात जालाय.

3 ठार, 2 गंभीर, 8 जखमी

पिकअप गाडी पलटी झाल्याने हा अपघात झाला. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून एकूण 8 जण जखमी झालेत. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या तीन मृत तरुणांमध्ये चोपडा तालुक्यातील तरुणांचा समावेश आहे. तर गंभीर जखमी तरुणांवर जळगाव येथे उपचार सुरू सध्या उपचार सुरु आहेत.

हे सुद्धा वाचा

सर्व मध्य प्रदेशातील आंबा अवतार या गावी कबड्डीची स्पर्धा पाहण्यासाठी गेले असताना रात्री त्यांच्या पिकअप गाडीचा अपघात झाला. मयत तरुणांची नावे निलेश शांतीलाल बारेला व जगदीश बारेला अशी आहेत. आणखी एकाला उपचारासाठी नेण्यात येत असताना रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. तर राहुल वेनसिंग बारेला (वय 18) व विवेक सुनील बारेला (वय 18) हे दोघेही जबर जखमी. चोपडा पोलीस या अपघाताबाबत माहिती घेत असून अपघाताबद्दल वैजापूरसह चोपडा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताने रस्ते अपघातातील बळींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.

मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.