Jalgaon Double Murder : दुहेरी हत्याकांडाने जळगाव हादरलं! मुलावर गोळी झाडली, मुलीचा गळा दाबला, चोपड्यात प्रेमप्रकरणातून हत्याकांड
Jalgaon Double Murder : जळगावच्या चोपडामध्ये एका मुलाला गोळी मारुन ठार मारण्यात आलं. तर मुलीची गळा दाबून हत्या करण्यात आली.
जळगाव : जळगाव दुहेरी हत्याकांडाने (Jalgaon Double Murder) हादरलंय. जळगावच्या चोपडामध्ये (Chopda Jalgaon News) एका मुलाला गोळी मारुन ठार मारण्यात आलं. तर मुलीची गळा दाबून हत्या करण्यात आली. प्रेमप्रकरणातून (Love Affair Crime) दुहेरी हत्याकांडाचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच घबराट पसरली असून खळबळ माजली आहे. चोरडा शहराजवळ असलेल्या जुना वराड शिवारात दोघांचे मृतदेह आढळून आल्यानंतर हे धक्कादायक प्रकरण समोर आलं. राकेश संजय राजपूत असं गोळी घालून हत्या कऱण्यात आलेल्या मुलाचं नाव आहे, तर वर्षा समाधान कोळी असं मुलीचं नाव आहे. राकेशचं वय 22 वर्ष असून वर्षा 20 वर्षां होती. या हत्याकांडप्रकरणी पोलिसांना दोघा संशयितांना ताब्यात घेतलंय. तर इतर दोन संशयित आरोपींचा शोध सुरु आहे.
सख्खा भाऊच मारेकरी..
राकेश आणि वर्षा यांचं एकमेकांवर प्रेम होतं. ते पळून जाणार होतो. याबाबत वर्षाच्या भावाला कळल्यानंतर त्यानं दोघांचीही हत्या केली. वर्षा हिच्या अल्पवयीन भावाने आधी राकेशच्या डोक्यात गोळी झाडली आणि त्यानंतर बहिणीची गळा दाबून हत्या केली. त्याआधी दोघांना बाईकवरुन बसून आणण्यात आलं होतं.
वर्षाच्या लहान भावासह इतर तीन जणांनी राकेश आणि वर्षा या दोघांना बाईकवरुन चोपडा ते वराडे मार्गावर असलेल्या नाल्याजवळ आणलं होतं. तिथं या दोघांची हत्या करण्यात आली. लहान भावाने बहिणीचा रुमालाने गळा दाबला आणि तिची हत्या केली. याघटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात गेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवले आहेत. हत्या करण्यात आलेल्या प्रेमी युगुलाच्या परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून तणावपूर्ण वातावरण आहे.
पिस्तुलासह पोलिसांसमोर सरेंडर
बहिणीसह तिच्या प्रियकराची हत्या केल्यानंतर सख्खा भाऊ पोलीस स्टेशनमध्ये स्वतःहून हजर झाला पिस्तुलासह हजर झालेल्या एका अल्पवयीन मुलाने आपण दोघांचा खून केल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तरुणाने दिलेल्या माहितीच्या आधारे पाहणी केली असता त्यांना दोन मृतदेह आढळून आले. त्यात मुलाला गोळी झाडण्यात आलेली होती, तर मुलीचा गळा दाबून खून करण्यात आलेला होता, हेही स्पष्ट झालं. आता सध्या चोडपा शहर पोलीस या दुहेरी हत्याकांडप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.