पंक्चर काढायला उभ्या ट्रकवर दुसरा ट्रक धडकला, मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात

मुंबई-नाशिक महामार्गावर पिंपरी फाटा येथे अपघात झाला. टायर पंक्चर झाल्यामुळे ट्रक महामार्गाच्या बाजूला उभा होता. पंक्चर काढण्यासाठी उभ्या असलेल्या दोन ट्रकला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली

पंक्चर काढायला उभ्या ट्रकवर दुसरा ट्रक धडकला, मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात
नाशकात रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकला दुसऱ्या ट्रकची धडक
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 11:11 AM

इगतपुरी : महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला भीषण अपघात (Truck Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबई नाशिक महामार्गावर (Mumbai Nashik Highway) पिंपरी फाटा परिसरात हा अपघात घडला. टायर पंक्चर झाल्यामुळे दोन ट्रक हायवेच्या कडेला उभे होते. पंक्चर काढण्यासाठी उभ्या असलेल्या एका ट्रकला मागच्या बाजूने दुसऱ्या ट्रकने धडक दिली. यामुळे एक ट्रक रस्त्याच्या शेजारी असलेल्या नाल्यात कोसळला. या अपघातात दोघे जण जखमी झाल्याची माहिती आहे. धडक दिल्यानंतर मागील ट्रकचा चालक घटनास्थळावरुन पसार झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ट्रक बाजूला करण्याचं काम चालू असून वाहतूक सुरळीत सुरु आहे.

नेमकं काय घडलं?

मुंबई-नाशिक महामार्गावर पिंपरी फाटा येथे अपघात झाला. टायर पंक्चर झाल्यामुळे ट्रक महामार्गाच्या बाजूला उभा होता. पंक्चर काढण्यासाठी उभ्या असलेल्या दोन ट्रकला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत एक ट्रक रस्त्याचा बाजूला असलेल्या नाल्यात कोसळला.

Nashik Igatpuri Truck Accident 2

नाशकात ट्रकला अपघात

या अपघातात 2 जण जखमी झाले. महामार्ग वाहतूक पोलीस यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत त्यांना पुढील उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. तर धडक देणारा ट्रक चालक अपघातानंतर घटनास्थळावरुन पसार झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दोन्ही ट्रक बाजूला करण्याचे काम सुरू असून वाहतूक सुरळीत सुरू आहे.

संबंधित बातम्या :

थेट किराणा दुकानात शिरली भरधाव कार, नाशकातला अपघाताचा थरार CCTVमध्ये कैद

कॉलेज विद्यार्थ्यांच्या बसला नाशकात भीषण अपघात, ट्रकला धडकून बस आडवी

127 किमी वेगाने दुचाकी झाडावर आदळली; 2 मित्र 30 फूट खोल खड्ड्यात पडून गतप्राण

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.