CCTV | तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडला, Nashik मध्ये तीन वर्षांचा चिमुरडा आश्चर्यकारकरित्या बचावला
खेळता खेळता फयजान बाल्कनीच्या ग्रीलमधून खाली डोकवला. तोल गेल्याने फेयजान तिसऱ्या मजल्यावरुन चांदणी चौकच्या रस्त्यावरती पडला. त्या ठिकाणी उभ्या असलेल्या एका व्यक्तीने धाव घेतली.
नाशिक : ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय देणारी एक घटना नाशिकमधून समोर आली आहे. अवघ्या तीन वर्षांचा चिमुरडा तिसऱ्या मजल्यावरुन (Third Floor) खाली पडला, मात्र केवळ नशीब बलवत्तर म्हणून तो सुखरुप बचवला. या घटनेचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद (CCTV Camera) झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील (Nashik) निफाड तालुक्यातील ओझर येथील चांदनी चौकातील अलसना अपार्टमेंट येथे ही घटना घडली. फेयजान सद्दाम शेख हा तीन वर्षांचा मुलगा तिसऱ्या मजल्यावरुन थेट खाली रस्त्यावर पडला होता. मात्र तो आश्चर्यकारकरित्या बचावल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला.
नेमकं काय घडलं?
नाशिकमधील ओझर येथील अलसना या अपार्टमेंटमध्ये शेख कुटुंब तिसऱ्या मजल्यावर राहते. दुपारी 12.50 वाजताच्या सुमारास तीन वर्षांचा फयजान आपल्या घराच्या बाल्कनीत खेळत होता. यावेळी त्याची आई घरात काम करत होती.
खेळता-खेळता ग्रीलमधून पडला
खेळता खेळता फयजान बाल्कनीच्या ग्रीलमधून खाली डोकवला. तोल गेल्याने फेयजान तिसऱ्या मजल्यावरुन चांदणी चौकच्या रस्त्यावरती पडला. त्या ठिकाणी उभ्या असलेल्या एका व्यक्तीने धाव घेतली. त्यानंतर फेयजानला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. एवढ्या उंचीवरुन पडून देखील फेयजानला दुखापत झाली नसल्याने डॉक्टरांनीदेखील आश्चर्य व्यक्त केले आहे.
पाहा व्हिडीओ :
CCTV | तिसऱ्या मजल्यावरुन पडूनही तीन वर्षांचा चिमुरडा आश्चर्यकारकरित्या बचावला #Nashik pic.twitter.com/6WjN0nctH2
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 25, 2022
संबंधित बातम्या :
भरधाव रिक्षा उलटली, पहाटे चार वाजता अपघाताचा थरार, 15 वर्षांचा मुलगा ठार
जळगावहून मित्रांसोबत गोव्याला, लाटेसोबत वाहून गेल्याने तरुणाचा बुडून मृत्यू
सिलिंग कोसळल्याने एकाच कुटुंबातील चौघे जखमी, दाम्पत्यासह दोन मुलं गंभीर