पॅरोलवर सुटल्यानंतर ब्यूटी पार्लर चालक महिलेवर बलात्कार, नाशिकचा नराधम काही तासात जेरबंद

नाशिकमध्ये पवननगर भागात एका व्यावसायिक महिलेवर बलात्कार झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली होती. सराईत गुन्हेगाराने चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप झाला होता

पॅरोलवर सुटल्यानंतर ब्यूटी पार्लर चालक महिलेवर बलात्कार, नाशिकचा नराधम काही तासात जेरबंद
minor girl
Follow us
| Updated on: Sep 29, 2021 | 8:47 AM

नाशिक : ब्यूटी पार्लर चालक महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. नाशिकच्या सीबीएस परिसरातून मंगळवारी रात्रीच्या सुमारास पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. पवननगर परिसरात महिला आपल्या पार्लरमध्ये पूजा करत असताना आरोपीने दुकानात शिरुन महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप होत आहे. पॅरोलवर सुटल्यानंतर फरार झालेल्या सराईत गुन्हेगाराने चाकूचा धाक दाखवून अत्याचार केला होता.

नेमकं काय घडलं?

नाशिकमध्ये पवननगर भागात एका व्यावसायिक महिलेवर बलात्कार झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली होती. सराईत गुन्हेगाराने चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप झाला होता. या भागात पीडित महिलेचं ब्यूटी पार्लर आहे. महिला आपल्या पार्लरमध्ये पूजा करत असताना आरोपी तिच्या दुकानात घुसला होता. त्यानंतर आतून दरवाजा लावून आरोपीने तिला चाकूचा धाक दाखवला. महिलेच्या तोंडात बोळा कोंबून, तिचे हात बांधून तिच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप होत आहे.

खुनाच्या गुन्ह्यात जेलमधून पॅरोलवर 

बलात्काराच्या घटनेनंतर हिंमत करुन महिलेने अंबड पोलिसात तक्रार दाखल केली होती. खुनाच्या गुन्ह्यात जेलमधून पॅरोलवर सुटल्यानंतर संशयित फरार झाला होता. त्याचा शोध सुरु असतानाच त्याने बलात्काराचा गुन्हा केला होता. त्यामुळे नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळालं. अंबड पोलीस ठाण्यात दाखल होत त्यांनी आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची चार पथकं तयार केली होती. या फरार संशयित आरोपीचा अखेर काही तासांतच शोध लागला.

नागपुरात 24 वर्षीय युवतीवर बलात्कार

दुसरीकडे, 24 वर्षीय युवतीचे लैंगिक शोषण करुन ती गरोदर राहिल्यानंतर तिला गर्भपात करण्यास भाग पाडल्या प्रकरणी नागपूर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही घटना उत्तर नागपुरातील यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. यूट्यूबवर व्हिडीओ पाहून बलात्कार पीडितेने आपल्या घरीच स्वत:चा गर्भपात केल्यानंतर ही बाब उघडकीस आली.

काय आहे प्रकरण?

आरोपी सोहेल वहाब खान आहे आणि पीडित तरुणी जवळपास गेल्या सहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. सोहेलने 2016 पासून वारंवार आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबात केला. टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, जेव्हा पीडित तरुणी गर्भवती झाली, तेव्हा आरोपीने तिला यूट्यूबवर व्हिडीओ पाहून स्वत:चा गर्भपात करण्यास सांगितले. कुटुंब घरात नसताना तिने घरीच नाळ कापून गर्भपात केल्याची माहिती आहे.

स्मशानभूमीत गर्भाचे दफन

अहवालात म्हटले आहे की, सोहेलने ताज नगर स्मशानभूमीत गर्भाचे दफन केले. काही आठवड्यांपूर्वी ही घटना घडली होती, मात्र गेल्या आठवड्यात महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधला. पीडितेच्या कुटुंबाला असे वाटते, की सोहेलने तिला खोटी आश्वासने देऊन फसवले, कारण तो आधीच विवाहित असून त्याला एक अपत्यही आहे, तर त्याची आर्थिक स्थिती फारशी बरी नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

आरोपीचे दोन वेळा लग्न

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सोहेल खान हा ड्रायव्हर असून यापूर्वी दोनदा त्याचे लग्न झाले आहे. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर त्याने काही वर्षांपूर्वी दुसरे लग्न केले होते आणि त्याला एक मुलगाही आहे. तक्रारीनुसार पोलिसांनी 23 सप्टेंबर रोजी खानविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आणि त्याला ताब्यात घेतले. तर फॉरेन्सिक टीमने गर्भाचे अवशेष बाहेर काढण्याचा प्रयत्नही केला, मात्र तो सफल होऊ शकला नाही.

डीएनए नमुन्यांसाठी आम्ही गर्भाचे अवशेष बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो पण दुर्दैवाने त्याचा शोध लागला नाही. आम्ही अजूनही गर्भाचे अवशेष शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, असे पोलीस अधिकारी म्हणाले. पोलीस पुढील तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

ब्यूटी पार्लर चालक महिलेवर नाशकात बलात्कार, पॅरोलवर सुटलेल्या आरोपीकडून चाकूच्या धाकाने अत्याचार

निल्या आणि गण्याने माझ्यावर बलात्कार केला, भगवद्गीतेत सुसाईड नोट ठेवत तरुणीची आत्महत्या

अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मुलाचा बलात्कार, अश्लील व्हिडिओ दाखवून अत्याचार; नाशिकमध्ये दोघांना बेड्या

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.