Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धारदार शस्त्र नाचवत गाड्यांची तोडफोड, नागरिकांना दमबाजी, नाशकातले पाच गुंड पोलिसांच्या ताब्यात

नाशिकच्या सिडको परिसरामध्ये हातात धारदार शस्त्र नाचवत गाड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास हातात कोयते-तलवारी नाचवत गुंडांच्या एका टोळक्याने भर रस्त्यात गाड्यांची तोडफोड करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता.

धारदार शस्त्र नाचवत गाड्यांची तोडफोड, नागरिकांना दमबाजी, नाशकातले पाच गुंड पोलिसांच्या ताब्यात
नाशिकमध्ये कारची तोडफोड करणारे गुंड ताब्यात
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 9:45 AM

नाशिक : हातात धारदार शस्त्र नाचवत गाड्यांची तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार कार नाशकात (Nashik Crime) उघडकीस आला होता. या प्रकरणातील पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नाशिकच्या सिडको परिसरामध्ये बुधवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली होती. जवळपास दहा ते बारा गाड्यांच्या काचा फोडत (Car Windows Vandalize) हे टोळकं परिसरात लोकांना दमबाजी करत होतं. धक्कादायक म्हणजे या टोळक्यांपैकी एक जण अल्पवयीन आहे. आगामी नाशिक महापालिका निवडणुकांच्या तोंडावर (Nashik Municipal Corporation Election) वर्चस्ववादातून सिडको परिसरातली गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. त्यामुळे पोलीस आता कधी आपला खाक्या दाखवणार याची प्रतीक्षा नागरिकांना आहे.

काय आहे प्रकरण?

नाशिकच्या सिडको परिसरामध्ये हातात धारदार शस्त्र नाचवत गाड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास हातात कोयते-तलवारी नाचवत गुंडांच्या एका टोळक्याने भर रस्त्यात गाड्यांची तोडफोड करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता. आगामी निवडणुकांच्या तोंडावर वर्चस्ववादातून सिडको परिसरातली वाढती गुन्हेगारी पोलिसांसाठी आव्हान ठरत असल्याने पोलीस आता कधी आपला खाक्या दाखवणार याची प्रतीक्षा आहे.

गाड्यांची तोडफोड, नागरिकांना दमबाजी

अचानक रस्त्यावर आलेल्या या टोळक्‍यामुळे नागरिकांची पळापळ तर झालीच, मात्र जवळपास दहा ते बारा गाड्यांच्या काचा फोडत हे टोळकं परिसरात लोकांना दमबाजी करत फिरत राहिलं. पोलिसांनी या प्रकरणी पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून यातील एक आरोपी हा अल्पवयीन असल्याची माहिती आहे.

वाईन शॉपसमोरच अड्डा

शुभम पार्क परिसरात एका माजी नगरसेवकाच्या मालकीचे वाईन शॉप आहे. येथे अनेक जण मद्य घेतात. आणि परिसरातच पीत बसतात. अनेक मद्यपी महिला आणि तरुणींची छेड काढतात. रस्त्यावरील येणा-जाणाऱ्यांनाही धमक्या देतात. त्यामुळे या भागातून हे वाईन शॉप हटवावे, अशी मागणी जोर धरते आहे. यापूर्वी एका शिष्टमंडळाने यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. आता तर सरकार गल्लोगल्ली वाईन विकायचे म्हणते आहे. तेव्हा काय होईल, असा सवालही विचारला जात आहे.

निवडणुकांच्या तोंडावर वर्चस्ववाद

आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर वर्चस्ववादातून हे प्रकार सिडको परिसरात वाढत असल्याचं समोर आला आहे. तडीपार गुंड, त्याचप्रमाणे शिक्षा भोगून आलेले गुंड यांची दहशत सिडको परिसरात बघायला मिळत आहे. या टोळ्यांनी पोलिसांसमोर एक नवं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे आगामी दिवसात पोलीस कशा पद्धतीने गुन्हेगारांच्या मुसक्या अवळणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

नाशिकमध्ये तलवारी घेऊन गुंडांचा रस्त्यावर हैदोस, वाहनांच्या काचा फोडून मारहाण

अनैतिक संबंधांचा संशय, बाईकवर बसवून मनमाड रोडवर नेलं, तरुणाकडून मेव्हण्याची हत्या

नाशिकमध्ये 11 वर्षांच्या मुलाचे अपहरण, गुंतागुंतीचे नेमके प्रकरण काय?

हिंदूंच्या मंगळसूत्राचं रक्षण कोण करणार? उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
हिंदूंच्या मंगळसूत्राचं रक्षण कोण करणार? उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला.
'त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही', ठाकरेंचा भिडेंना टोला
'त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही', ठाकरेंचा भिडेंना टोला.
शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'
शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'.
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं.
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका.
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना.
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका.
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.