VIDEO | दे धपाधप! Propose Day ला वाद, नाशिकच्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन ग्रुपमध्ये तुफान हाणामारी
सध्या व्हॅलेंटाईन्स डेच्या पार्श्वभूमीवर तरुणांमध्ये विविध 'डेज्' सेलिब्रेट केले जात आहेत. मंगळवारी झालेल्या प्रपोज डे (Propose Day) ला विद्यार्थ्यांच्या दोन गटात काही कारणावरुन वाद झाला. बघता बघता या वादाचं रुपांतर तुफान हाणामारीमध्ये झालं.
नाशिक : विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुफान हाणामारी (Students Group Free Style Fighting) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्येच हा प्रकार घडला. सध्या व्हॅलेंटाईन्स डे (Valentine’s Day) च्या निमित्ताने विविध ‘डेज्’ सेलिब्रेट केले जात आहेत. अशात प्रपोज डे (Propose Day) साजरा होत असतानाच ही मारामारी झाली. विद्यार्थ्यांच्या दोन गटामध्ये कुठल्याशा कारणावरुन वाद झाला होता. या वादाचं पर्यवसन फ्री स्टाईल फायटिंगमध्ये झाल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यात निफाड गावातील कॉलेज कॅम्पसमध्ये दोन गटात ही तुफान हाणामारी झाली. यामध्ये काही विद्यार्थ्यांना अक्षरशः तुडव-तुडव-तुडवल्याचं पाहायला मिळत आहे. या घटनेचा व्हिडीओ काही जणांनी इन्स्टाग्राम अकाऊण्टवर शेअर केले आहेत. हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. मात्र कॉलेजमध्येच युवकांची मारामारी झाल्यामुळे महाविद्यालयातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
नेमकं काय घडलं?
सध्या व्हॅलेंटाईन्स डेच्या पार्श्वभूमीवर तरुणांमध्ये विविध ‘डेज्’ सेलिब्रेट केले जात आहेत. मंगळवारी झालेल्या प्रपोज डे (Propose Day) ला विद्यार्थ्यांच्या दोन गटात काही कारणावरुन वाद झाला. बघता बघता या वादाचं रुपांतर तुफान हाणामारीमध्ये झालं. नाशिक जिल्ह्यातील निफाड गावातील महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्येच हा प्रकार घडला. अनेकदा कॉलेजमध्ये अशा छोट्या-मोठ्या मारामाऱ्या होतच असतात. नाशिकमधील विद्यार्थ्यांच्या हाणामारीचे व्हिडीओ समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही.
विद्यार्थ्यांनी एकमेकांना तुडवलं
सुरुवातीला झालेल्या वादावादीनंतर दोन गटांमध्ये फ्री स्टाईल फायटिंग सुरु झालेली. त्यानंतर काही जणांनी एकमेकांना अक्षरशः तुडव-तुडव-तुडवल्याचं पाहायला मिळालं. कुठल्या मुलीला प्रपोज करण्यावरुन वाद झाला, की अन्य कुठल्या कारणावरुन, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तसंच कुठल्या विद्यार्थ्याला यात गंभीर दुखापत झाली आहे का, याबाबतही माहिती मिळालेली नाही. परंतु कॉलेजमध्येच विद्यार्थ्यांमध्ये इतकी मारामारी झाल्यामुळे महाविद्यालयातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या घटनेचा व्हिडीओ काही जणांनी इन्स्टाग्राम अकाऊण्टवर शेअर केले आहेत. हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे.
पाहा व्हिडीओ :
VIDEO | दे धपाधप! Propose Day ला वाद, नाशिकच्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन ग्रुपमध्ये तुफान हाणामारी pic.twitter.com/eBlsBS3vtP
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 9, 2022
संबंधित बातम्या :
VIDEO | कुटुंब रंगलंय ‘Fighting’मध्ये, मुलगी-मामा आणि आई, औरंगाबादेत भररस्त्यात हातघाई
Nagpur Video | कपड्यांवर पेट्रोलचे थेंब उडाल्याने वाद, पंपावरील महिला कर्मचाऱ्यांची तरुणीला मारहाण
VIDEO | प्रवाशांवरुन खेचाखेची, औरंगाबादमध्ये गाडी भरण्यावरुन चालकांची फ्री-स्टाईल हाणामारी