मालेगाव : सात वर्षांच्या प्रेम प्रकरणानंतर ब्रेक अप आणि अन्यत्र ठरलेले लग्न मोडल्याच्या संशयातून प्रेयसीने (Girlfriend) कुटुंबाच्या मदतीने जिवंत जाळलेल्या प्रियकराचा (Boyfriend burnt alive) दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी नाशिकमधील (Nashik Crime) देवळा तालुक्यातील लोहणेर गावात हा प्रकार घडला होता. प्रियकर गोरख बच्छाव याच्या अंगावर पेट्रोल टाकून प्रेयसी आणि तिच्या कुटुंबीयांनी त्याला जिवंत जाळले होते. त्याच्यावर नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान अखेर त्याला मृत्यूने गाठले. या घटनेत गोरख 80 टक्के भाजल्याची माहिती समोर आली होती. देवळा पोलिसांनी या प्रकरणी प्रेयसी कल्याणी सोनवणेसह तिची आई, वडील आणि दोन भाऊ अशा पाच जणांना अटक केली आहे. सात वर्षांच्या प्रेम संबंधांनंतर ब्रेक अप केले आणि अन्यत्र ठरलेले लग्न मोडल्याच्या रागातून गर्लफ्रेण्डने कुटुंबाच्या साथीने आपल्या बॉयफ्रेण्डला जिवंत जाळल्याचा आरोप आहे.
आरोपी युवती आणि मयत तरुणाचे गेल्या सात वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र दोन महिन्यांपूर्वीच त्यांचे काही कारणाने ब्रेकअप झाले. यानंतर मुलीचे दुसरीकडे लग्न ठरले होते. परंतु वरपक्षाने नंतर ते लग्न मोडले. मात्र मयत तरुणानेच ब्रेकअप केल्याच्या रागातून आपले अन्यत्र ठरलेले लग्न मोडले, असा संशय आरोपी प्रेयसी आणि तिच्या कुटुंबीयांना होता.
याच संशयातून युवती, तिचे आई-वडिल आणि दोन भाऊ यांनी मुलाच्या गावात जाऊन त्याला जाब विचारला. त्यानंतर त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. नाशिक जिल्ह्यात देवळा तालुक्यातील लोहणेर गावात शुक्रवारी हा प्रकार घडला होता.
या घटनेची माहिती देवळा पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी झालेल्या तरुणाला नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तसेच युवतीसह तिच्या कुटुंबातील पाच जणांना अटक केली. यानंतर या पाचही जणांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली.
संबंधित बातम्या :
नाशिकमधील देवळा जळीतकांड प्रकरण, पाचही आरोपींना 3 दिवस पोलीस कोठडी
हरवलेली 10 वर्षांची चिमुरडी रात्री उशिरा घरी परतली! घरी आल्यानंतर कळलं की तिच्यावर बलात्कार झालाय
फरशीनं वार, 16 वर्षांच्या तरुणाचा खून! परभणी हादरलं, का करण्यात आली निर्घृणपणे हत्या?