नाशकात 24 लाखांचा Goa Made दारुसाठा जप्त, उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
उत्पादन शुल्क विभागाने तब्बल 24 लाख रुपये किमतीचा गोवा मेड दारुचा साठा हस्तगत केला आहे. कुरिअरच्या सील बंद ट्रॅक मध्ये विदेशी दारु आणि बिअरचा लाखो रुपये किमतीचा हा साठा चोरी छुप्या मार्गाने महाराष्ट्र आणि गोव्यात विक्री साठी नेला जात होता.
नाशिक : नाशिकच्या उत्पादन शुल्क विभागाने (Excise Department) तब्बल 24 लाख रुपये किमतीचा गोवा निर्मित मद्य साठा (Goa Made Liquor) जप्त केला आहे. कुरिअरच्या सील बंद ट्रॅक मध्ये विदेशी दारु आणि बियरचा लाखो रुपये किंमतीचा हा साठा चोर मार्गाने महाराष्ट्र आणि गोव्यात विक्री साठी नेला जात होता. त्यावेळी नाशिकच्या (Nashik Crime News) उत्पादन शुल्क विभागाने हा माल नाशिक हद्दीत पकडत जप्त केला आहे. या कारवाईत वाहन चालकाला अटक करण्यात आली आहे, तर हा माल कुणाच्या माध्यमातून विक्री साठी आणला जात होता याचा शोध घेतला जात आहे.
काय आहे प्रकरण?
उत्पादन शुल्क विभागाने तब्बल 24 लाख रुपये किमतीचा गोवा मेड दारुचा साठा हस्तगत केला आहे. कुरिअरच्या सील बंद ट्रॅक मध्ये विदेशी दारु आणि बिअरचा लाखो रुपये किमतीचा हा साठा चोरी छुप्या मार्गाने महाराष्ट्र आणि गोव्यात विक्री साठी नेला जात होता.
24 लाखांचा मद्य साठा जप्त
नाशिकच्या उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत नाशिक हद्दीत दारु साठा पकडला. या कारवाईत 24 लाख रुपये किमतीचा मद्य साठा जप्त करण्यात आला आहे, तर आरोपी वाहन चालकाला अटक करण्यात आली आहे.
तस्करीचं कारण काय?
हा माल कुणाच्या माध्यमातून विक्री साठी आणला जात होता याचा शोध घेतला जात आहे. कर चुकवत आणला जाणारा हा माल गोव्याच्या तुलनेत इतर राज्यात दुप्पट किमतीने विकला जात असल्याने गोवा निर्मित मद्याची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. नाशिक उत्पादन शुक्ल विभागाच्या या कारवाईने मद्य तस्करांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.