Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनैतिक संबंधांचा संशय, बाईकवर बसवून मनमाड रोडवर नेलं, तरुणाकडून मेव्हण्याची हत्या

अनैतिक संबंधांच्या संशयातून तरुणाने मेव्हण्याची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. लासलगाव-मनमाड रोडलगत अनिल अहिरे याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला होता. या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती.

अनैतिक संबंधांचा संशय, बाईकवर बसवून मनमाड रोडवर नेलं, तरुणाकडून मेव्हण्याची हत्या
अनैतिक संबंधांच्या संशयातून मेहुण्याची हत्या
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 12:24 PM

मनोहर शेवाळे, टीव्ही9 मराठी, मनमाड : अनैतिक संबंधांच्या संशयातून (Extra Marital Affair) तरुणाने मेव्हण्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकमध्ये दोन दिवसांपूर्वी घडलेल्या हत्याकांडामुळे (Nashik Crime) एकच खळबळ उडाली होती. लासलगाव-मनमाड रोडवर अनिले अहिरे नामक व्यक्तीचा खून झाला होता. या गुन्ह्याचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी शिताफीने तपास केला. अनैतिक संबंधाच्या कारणावरुन भावोजींनी मेव्हण्याचा (साल्याचा) खून केल्याचे निष्पन्न (Brother in law Murder) झाले. या प्रकरणी पोलिसांनी मयत तरुणाचा मेव्हणा दत्तात्रय अहिरे याला बेड्या ठोकल्या आहेत. अवघ्या 48 तासातच मारेकऱ्याला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. महामार्गालगत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात संशयित मारेकरी आणि मयत एकाच दुचाकीवरुन आल्याचे दिसले. त्यामुळे आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले.

काय आहे प्रकरण?

अनैतिक संबंधांच्या संशयातून तरुणाने मेव्हण्याची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. लासलगाव-मनमाड रोडलगत अनिल अहिरे याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला होता. या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती.

दुचाकीवरुन मेहुणा-भावजी निघाले

या गुन्ह्याचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी शिताफीने तपास केला. पोलिसांनी टोल नाका आणि महामार्गावरील इतर सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका टोल नाक्यावर सीसीटीव्ही फुटेजमध्ये मयताच्या मागे संशयित मारेकरी बसला असल्याचे दिसून आले.

मेहुण्याकडून हत्येची कबुली

पोलिसांनी दत्तात्रय अहिरे (रा. गंगावे, ता. चांदवड) याला ताब्यात घेतले. पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अहिरे याने अनैतिक संबंधाच्या कारणावरुन मेहुणा अनिल अहिरे याचा खून केल्याचा पोलिसांना संशय आहे. अवघ्या 48 तासातच पोलिसांनी मारेकऱ्याला गजाआड केले.

सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपी गजाआड

महामार्गालगत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात संशयित मारेकरी आणि मयत एकाच दुचाकीवरुन आल्याचे दिसले. त्यामुळे आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले.

संबंधित बातम्या :

घरमालकिणीचा अनैतिक संबंधांना नकार, पुण्यात भाडेकरुकडून 30 वर्षीय विवाहितेची हत्या, बाथरुममध्ये मृतदेह आढळला

मेहुणीला लग्नाचं वचन, बायकोचा मर्डर, महिला पोलिसांशी अनैतिक संबंध, स्त्रीलंपट नवऱ्याला अटक

रात्री नवरा अचानक घरी, पत्नी प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत, एकही शब्द न बोलता नवऱ्याने…

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.