चक्क पोलिसाकडून अल्पवयीन मुलीचे अपहरण, नाशकात खळबळ

संशयित पोलीस दीपक जठार हा नाशिकमधील उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. संशयिताच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत देखील गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. संशयिताने पीडित मुलीच्या घरच्यांशी असलेल्या ओळखीचा फायदा घेत अपहरण केल्याचा आरोप आहे

चक्क पोलिसाकडून अल्पवयीन मुलीचे अपहरण, नाशकात खळबळ
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Sep 14, 2021 | 8:49 AM

नाशिक : पोलिसानेच अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फूस लावून अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या पोलिसाला अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरात ही घटना घडल्याची माहिती आहे.

कुटुंबीयांशी ओळखीचा पोलिसाकडून गैरफायदा

संशयित पोलीस दीपक जठार हा नाशिकमधील उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. संशयिताच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत देखील गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. संशयिताने पीडित मुलीच्या घरच्यांशी असलेल्या ओळखीचा फायदा घेत अपहरण केल्याचा आरोप आहे. फूस लावून त्याने तिला पळवून नेल्याचा दावा केला जात आहे. या घटनेमुळे नाशिकच्या पंचवटी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मुंबईत अल्पवयीन मुलीचं अपहरण

दुसरीकडे, बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान याची भेट करुन देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचं अपहरण केल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी मुंबईत समोर आला होता. या प्रकरणी 43 वर्षीय आरोपीला बेड्या ठोकण्यात रेल्वे पोलिसांना यश आलं होतं. दादर जीआरपीने मोठ्या शिताफीने पीडितेला आरोपीच्या तावडीतून सुखरुप सोडवलं होतं. आरोपीचं नाव सुभान शेख होतं, त्याने फेसबुकवर पीडित तरुणीसोबत ओळख निर्माण केली होती.

आरोपीने फेसबुक अकाऊंटवर 20 वर्षीय तरुणाचे फोटो लावले होते. त्याचबरोबर त्याने आपल्या प्रोफाईलमध्ये मोठमोठ्या कलाकारांसोबतचे फोटोही शेअर केले होते. आरोपीने स्वत:ला इव्हेंट मॅनेजर असल्याचे सांगितले होते. त्याने मुलीला शाहरुख खानला भेटणार का? असं विचारलं असता मुलीने होकार दिला होता.

स्वतःला विशीतील तरुण भासवणाऱ्या 43 वर्षीय आरोपीने मुलीला फेसबुकवर मेसेज केला होता की, कामामध्ये व्यस्त असल्यामुळे तो आपल्या वडिलांना रेल्वे स्टेशनवर तिला घेण्यासाठी पाठवत आहे. मात्र ओळख लपवणारा आरोपी स्वतःच तिला घेण्यासाठी दादर रेल्वे स्टेशनवर पोहोचला. आरोपीने मुलीला भेटल्यानंतर तिच्या मोबाईलचं सीमकार्ड तोडलं. पण रेल्वे पोलिसांनी आरोपीला बरोबर हेरलं. त्यानंतर अल्पवयीन मुलीला त्याच्या तावडीतून सुखरुप सोडवलं आणि आरोपीला अटक केली.

नागपुरात आंघोळीचा व्हिडीओ शूट करत तरुणीचे अपहरण

दरम्यान, तरुणी आंघोळ करत असतानाचा व्हिडीओ चित्रित करुन आधी तो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली, त्यानंतर तरुणीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी हा तरुणीच्या नाते संबंधातील असल्याची माहिती समोर आली आहे.

संबंधित बातम्या :

शाहरुख खानसोबत भेट घडवून देण्याचा बहाणा, दादर स्थानकावर अल्पवयीन मुलीचं अपहरण, पोलिसांनी कसं सोडवलं ?

तरुणी आंघोळ करताना व्हिडीओ शूट, स्क्रीनशॉट व्हायरल, नागपुरात अल्पवयीन शेजाऱ्याचा प्रताप

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेशी अश्लील चाळे, इंजिनिअरिंग विद्यार्थ्याला अटक

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.