CCTV | भरधाव रिक्षा अचानक रस्त्यात घसरली, सात वर्षांच्या चिमुकलीसह चौघं जखमी

या अपघातात सात वर्षांची चिमुकली जखमी झाली आहे. तर तिच्यासोबत रिक्षाने प्रवास करणारे तिचे पालक आणि रिक्षा चालकही या अपघातात जखमी झाल्याची माहिती आहे.

CCTV | भरधाव रिक्षा अचानक रस्त्यात घसरली, सात वर्षांच्या चिमुकलीसह चौघं जखमी
नाशिकमध्ये रिक्षाचा भीषण अपघात
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 11:02 AM

नाशिक : नाशिकमध्ये रिक्षाचा भीषण अपघात (Rickshaw Accident) झाला आहे. अपघातात सात वर्षांची चिमुकली जखमी झाली आहे. लहान मुलीसोबत रिक्षाने प्रवास करणारे तिचे पालक आणि रिक्षा चालकही या अपघातात जखमी झाल्याची माहिती आहे. नाशिक रोड (Nashik Road) परिसरात असलेल्या मिल्लत पब्लिक स्कूलच्या बाहेर हा प्रकार घडला. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झाल्याचं समोर आलं आहे. भरधाव वेगाने जाणारी रिक्षा अचानक आडवी (Auto Rickshaw Overturn) पडली. तर रिक्षाचा धक्का लागून रस्त्याच्या कडेला असलेली दुचाकीही खाली कोसळली. या अपघाताची दृश्यं सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहेत. नाशिक रोड पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताची भीषण दृश्यं पाहून अंगावर अक्षरशः काटा येतो.

नेमकं काय घडलं?

नाशिकमध्ये रिक्षाचा भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे. भरधाव वेगात असलेली रिक्षा अचानक आडवी पडली. तर रिक्षाचा धक्का लागून रस्त्याच्या कडेला असलेली दुचाकीही खाली कोसळली.

चिमुकलीसह चौघं जण जखमी

या अपघातात सात वर्षांची चिमुकली जखमी झाली आहे. तर तिच्यासोबत रिक्षाने प्रवास करणारे तिचे पालक आणि रिक्षा चालकही या अपघातात जखमी झाल्याची माहिती आहे.

पोलिसात गुन्हा

नाशिक रोड परिसरात असलेल्या वसंत विहारमधील मिल्लत पब्लिक स्कूलच्या बाहेर हा अपघात झाला. काल (मंगळवारी) झालेल्या या  भीषण अपघाताची दृश्यं सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहेत. नाशिक रोड पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

कंटेनर गेटला घासत नाही ना? ड्रायव्हर उतरताच गाडी अचानक पुढे, गेटमध्ये अडकून जागीच मृत्यू

 ज्या अपघातात अभिनेता दीप सिद्धूचा अंत झाला, त्या गाडीची अवस्था दाखवणारा व्हिडीओ पाहा

 पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर सात गाड्यांचा विचित्र अपघात, दोन ट्रकमध्ये चिरडलेल्या कारमधील चौघे जागीच ठार

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.