CCTV VIDEO | नाशकात शालेय मुलांची रस्त्यात हाणामारी, तलावात बुडवून विद्यार्थ्याची हत्या
शालेय विद्यार्थ्यांमधील वाढत्या हिंसाचाराची दुसरी घटना आठवड्याभरात समोर आली आहे. शाळकरी मुलांच्या दोन गटात झालेल्या हाणामारीत एकाची हत्या करण्यात आली. तलावात बुडवून केलेल्या बेदम मारहाणीत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.
नाशिक : ठाण्यापाठोपाठ नाशिकमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या दोन गटामध्ये हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या मारामारीमध्ये एका विद्यार्थ्याला प्राण गमवावे लागले. वाद मिटवण्याचा प्रयत्न सुरु असताना तो पुन्हा उफाळून आला आणि त्याचं पर्यवसन जबर हाणामारीत झालं. मारामारी करताना दोघं जण तलावात पडले आणि यावेळी एका विद्यार्थ्याची पाण्यात बुडवून हत्या करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. हाणामारीच्या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे.
शालेय विद्यार्थ्यांमधील वाढत्या हिंसाचाराची दुसरी घटना आठवड्याभरात समोर आली आहे. शाळकरी मुलांच्या दोन गटात झालेल्या हाणामारीत एकाची हत्या करण्यात आली. तलावात बुडवून केलेल्या बेदम मारहाणीत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.
नेमकं काय घडलं?
जुनं भांडण मिटवण्यासाठी दोन गट समोरासमोर आले असताना त्यांच्यामध्ये पुन्हा वादावादी झाली. धक्काबुक्की झाली असताना दोघा जणांचा पाय घसरला आणि ते तलावात पडले. यावेळी एका विद्यार्थ्याची पाण्यात बुडवून हत्या करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे दोन अल्पवयीन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
पाहा व्हिडीओ
ठाण्यात विद्यार्थ्यांच्या हाणामारीत एकाचा मृत्यू
याआधी, दहावीच्या दोन तुकड्यांमधील विद्यार्थ्यांत झालेल्या हाणामारीत एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ठाणे शहरातील वागळे इस्टेट परिसरातील शाळेतून हा थरारक प्रसंग समोर आला आहे. ज्यात 15-16 वर्षांच्या मुलांनी त्यांच्याच वयाच्या विद्यार्थ्याचा जीव घेतला.
शाळेजवळील पाईपलाईन ब्रिजवर दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ज्यात तीन विद्यार्थ्यांनी पंधरा वर्षीय विद्यार्थ्याची छातीत सुरा खुपसून निर्घृण हत्या केली. विद्यार्थ्यावर झालेला वार इतका जोरदार होता की रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
संबंधित बातम्या :
शाळकरी मुलांचा खुनी खेळ, भांडणात एकाच्या छातीत सुरा खुपसला, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, ठाणे हादरलं