आईच्या निधनानंतर लेकाला विरह असह्य, येवल्यात 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या

आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहिली होती. एका छोट्या कागदावर लिहिलेली ही नोट पोलिसांना त्याच्या खिशात सापडली आहे.

आईच्या निधनानंतर लेकाला विरह असह्य, येवल्यात 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या
आईच्या आठवणीत तरुणाची आत्महत्याImage Credit source: टीव्ही 9
Follow us
| Updated on: May 13, 2022 | 1:05 PM

नाशिक : 25 वर्षीय तरुणाने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राहत्या घरी गळफास घेऊन तरुणाने आपल्या आयुष्याची अखेर केली. आईच्या विरहातून त्याने टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात (Nashik Crime News) हा प्रकार उघडकीस आला. विशाल उर्फ सोनू रामदास गायकवाड असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. त्याच्या खिशात पोलिसांना एका लहानशा कागदावर लिहिलेली चिठ्ठी (Suicide Note) आढळली आहे. विशालच्या आईचा काही महिन्यांपूर्वीच मृत्यू झाला होता. आपल्याला आईची आठवण येत असल्याचा त्याने सुसाईड नोटमध्ये उल्लेख केला आहे.

काय आहे प्रकरण?

नाशिक जिल्ह्यातील येवला शहरातील एन्झोकेम हायस्कूल समोर असलेल्या कॉम्प्लेक्समध्ये ही घटना घडली. राहत्या घरामध्ये विशाल उर्फ सोनू रामदास गायकवाड (वय 25 वर्ष) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

तरुणाच्या खिशात चिठ्ठी

आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहिली होती. एका छोट्या कागदावर लिहिलेली ही नोट पोलिसांना त्याच्या खिशात सापडली आहे.

हे सुद्धा वाचा

सुसाईड नोटमध्ये काय?

काही महिन्यांपूर्वीच मयत झालेल्या आईची खूप आठवण येत आहे. माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये, अशी चिठ्ठी त्याने लिहिली होती.

आईच्या विरहातून मुलाने केलेल्या आत्महत्येच्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे गायकवाड कुटुंबावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणाचा तपास येवला शहर पोलीस आता करत आहेत.

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.