Nashik Accident | कसारा घाटात एकामागून एक दोन अपघात, आधी आयशर पलटली, नंतर कंटेनर-कार अपघातात सहा महिला जखमी

नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात आयशर वाहनाचा अपघात झाला. ब्रेक फेल झाल्यानंतर आयशर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर पुढे जाणारी गाडी आणि ट्रकवर आयशर जोरदार धडकली. त्यानंतर आयशर रस्त्यातच पलटी झाली.

Nashik Accident | कसारा घाटात एकामागून एक दोन अपघात, आधी आयशर पलटली, नंतर कंटेनर-कार अपघातात सहा महिला जखमी
कसारा घाटात अपघातImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 8:23 AM

नाशिक : नाशिक मुंबई महामार्गावर (Nashik Mumbai Highway) नवीन कसारा घाटात एकामागून एक असे दोन अपघात झाले. पहिल्या अपघातात ब्रेक फेल झालेल्या आयशर वाहनाचा (Eicher Accident) अपघात झाला. ब्रेक फेल झाल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यानंतर पुढे जाणाऱ्या कार आणि ट्रकला आयशरने जोरदार धडक दिली. अपघातानंतर आयशर पलटी होऊन पडला. या अपघातात चौघे जण जखमी झाल्याची माहिती (Kasara Ghat Accident) आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे, तर उर्वरित तिघे जण हे किरकोळ जखमी असल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे या अपघातानंतर काही वेळात याच ठिकाणी आणखी एक अपघात झाला. कंटेनर चार गाड्यांना धडक दिल्याने सहा महिलांना किरकोळ दुखापत झाल्याचं वृत्त आहे.

नेमकं काय घडलं?

नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात आयशर वाहनाचा अपघात झाला. ब्रेक फेल झाल्यानंतर आयशर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर पुढे जाणारी गाडी आणि ट्रकवर आयशर जोरदार धडकली. त्यानंतर आयशर रस्त्यातच पलटी झाली.

या अपघातात एकूण चौघे जण जखमी झाल्याचं समोर आलं आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे, तर उर्वरित तिघे जण हे किरकोळ जखमी आहेत.

तसेच हा अपघात झाल्यावर काही वेळाने याच ठिकाणी उतारावर उतरत असताना स्पीड ब्रेकरवर एका कंटेनरने सलग चार वाहनांना धडक दिली. यात सहा महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत. महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव होत नरेंद्र महाराज रुग्ण संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळित झाली होती.

संबंधित बातम्या :

इंदुरीकर महाराज अपघातातून बालंबाल बचावले, लाकडं नेणाऱ्या ट्रॅक्टरला कारची भीषण धडक

जालना-नांदेड रोडवर विचित्र अपघात, ट्रकच्या मागच्या बाजूवर कार धडकली, एअरबॅग उघडली अन् जीव वाचले!

एसटी आणि JSW च्या बसची समोरासमोर भीषण धडक, 55 प्रवासी जखमी

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.