Nashik Murder : नवऱ्याने बायकोला ड्रममध्ये बुडवून मारलं! खळबळजनक हत्याकाडांने मालेगाव हादरलं, पतीला अटक
Melegaon Crime News : 21 जुलैला झालेल्या भांडणातून अब्दुल याने टोकाचं पाऊल उचललं.
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मालेगावात खळबळजनक हत्याकांड (Malegaon Murder News) उघडकीस आलं आहे. नवऱ्याने बायकोला चक्क ड्रममध्ये बुडवून ठार मारलंय. मालेगाव शहरातील रमजान पुरा भागात ही धक्कादायक घटना घडली. या घटनेनं मालेगाव हादरुन गेलं आहे. या प्रकरणी अखेर गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी नवऱ्याला पोलिसांनी अटकही केली असून त्याची कसून चौकशी आता केली जाते आहे. नवरा बायकोत सतत भांडणं होतं होती. नवऱ्याचा बायकोवर संशय होता. त्याने भांडणानंतर बायकोला मारहाणही केली होती. या मारहाणीनंतर रागाच्या भरात नवऱ्याने बायकोला पाण्याच्या ड्रममध्ये बुडवलं आणि तिचा जीव (Husband killed wife) घेतला. या थरारक हत्याकांडाने एकच खळबळ माजली आहे. 24 तासांत नाशिक जिल्ह्यात घडलेली हत्येची ही दुसरी घटना आहे. मालेगावसह येवल्यातही हत्याकांडाची घडना समोर आली होती. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात (Nashik Crime News) वाढत्या गुन्हेगारीचा आळा कसा घालायचा, असं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलंय.
नेमकं काय घडलं?
मालेगावात वाढती गुन्हेगारी पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे. वाढते गुन्हे रोखण्यात पोलिसांना काही प्रमाणात यशही आलं होतं. पण आता पुन्हा एका खळबळजनक हत्याकांडाने मालेगाव हादरलं. मालेगाव शहरातील रमजान पुरा भागात नवऱ्याने बायकोला ड्रममध्ये बुडवून ठार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय.
21 जुलैला रात्री हत्येचा थरार
मालेगाव शहरातील रमजान पुरा भागातील खान दाम्पत्य राहत होतं. अब्दुल वफा हा आपल्या पत्नीसह राहत होता. अब्दुलचा आपल्या बायकोवर संशय होता. त्यांनी नेहमीच भांडणं व्हायची. दरम्यान, 21 जुलैला झालेल्या भांडणातून अब्दुल याने टोकाचं पाऊल उचललंय. फिरस्ती बाबा दर्ग्याजवळ हे हत्याकांड घडलं.
21 जुलै रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास संशयित अब्दुल वफा याने पत्नीवर संशय घेत तिला मारहाण केली. मारहाण केल्यानंतर त्याने बायकोला पाण्याच्या प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये बुडवलं आणि तिचा जीव घेतला.
आरोपीची चौकशी सुरु
या प्रकरणी रमजान पुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. तसंच अदनान खान यांनी रमजान पुरा पोलिसात या हत्येप्रकरणी तक्रार दिली. त्यानंतर गुन्हा नोंदवून घेत पोलिसांनी संशयित पतीला ताब्यातही घेतलं. सध्या पोलीस ताब्यात घेतलेल्या अब्दुल खान यांची या हत्येप्रकरणी कसून चौकशी करत आहेत.