गुन्हेगाराला कुणी आणि कसं संपवलं…पोलिसांना आव्हान देणाऱ्या सराईत गुन्हेगार कायमच संपला…
ऐन वर्दळीचा परिसर असलेल्या अंबड परिसरात सराईत गुन्हेगार अक्षय जाधवचा खून झाल्याची बाब परिसरात वाऱ्यासारखी पसरली आहे.

नाशिक : शहरातील अंबड परिसरातील गुन्हेगारी काही कमी व्हायचे नाव घेत नाहीये. नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गुन्हेगाराची हत्या झाल्याची बाब समोर आली आहे. खरंतर नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात हत्या, हाणामाऱ्या, चोर, घरफोडी अशा घटना राजरोसपणे घडत असल्याने नागरिक भीतीच्या सावटाखाली वावरत आहे. ही सर्व परिस्थिती असतांना खुनाच्या घटणेने अंबड परिसर पुन्हा एकदा हादरला आहे. अंबड परिसरात झालेल्या हाणामारीत कोयत्याचा वार करीत एका गुन्हेगाराला संपवल्याची घटना समोर आली आहे. अक्षय जाधव असे मृत गुन्हेगाराचे नाव असून त्याच्या हत्येच्या दोघा संशयितांना अंबड पोलिसांनी रात्रीतूनच अटक केली आहे. या घटणेने शहरात खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ऐन वर्दळीचा परिसर असलेल्या अंबड परिसरात सराईत गुन्हेगार अक्षय जाधवचा खून झाल्याची बाब परिसरात वाऱ्यासारखी पसरली आहे.
अक्षय जाधव याचा शुक्रवारी रात्री डोक्यात कोयत्याचे वार करून हत्या केल्याची बाब समोर आल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.




गुन्हेगारी विश्वात वर्चस्व निर्माण करण्याच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलीसांच्या हाती लागली आहे.
दरम्यान ही घटना घडल्यानंतर अंबड पोलीसांनी खुनाचा गुन्हा दाखल रात्रीतूनच अक्षयच्या हत्येसंदर्भात असलेल्या संशयितांना ताब्यात घेतले आहे.
अंबड परिसरातील महालक्ष्मी नगर येथील आरोग्य केंद्राच्या समोर अक्षय जाधव आणि त्याचे मित्र बसलेले होते, त्यावेळी त्यांच्यात वाद झाला.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले त्यांतर तन्मय गोसावी याने त्याच्या हातात असलेल्या कोयत्याने अक्षयच्या डोक्यात वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता.
प्रत्यक्षदर्शी असलेल्या अक्षयच्या सहकाऱ्यांनी ही बाब पाहताच पोलीस ठाण्याकडे धाव घेत माहिती दिली मात्र तोपर्यंत अक्षयचा मृत्यू झाला होता.