Nashik : कार्यकारी अभियंत्याच्या घरी घबाड? नाशिकमध्ये दिनेशकुमार बागुल यांना 28 लाखाचा लाच घेताना अटक, ACBकडून कसून तपास

Dineshkumar Bagul : रात्री उशिरापर्यंत बागुल यांच्या निवासस्थानी एसीबीचं पथक कारवाई करत होतं. गुरुवारी 28 लाख रुपयांची लाच घेताना दिनेशकुमार बागुल यांना रंथेहाथ पकडण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आलेली.

Nashik : कार्यकारी अभियंत्याच्या घरी घबाड? नाशिकमध्ये दिनेशकुमार बागुल यांना 28 लाखाचा लाच घेताना अटक, ACBकडून कसून तपास
बियर प्यायल्यानंतर कारमध्येच बेशुद्ध, डॉक्टरांकडून मृत घोषितImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 26, 2022 | 8:02 AM

नाशिक : नाशिकमध्ये (Nashik News) गुरुवारी अँटी करप्शन विभागाने (ACB) कारवाई करत एका कार्यकारी अभियंत्याला (Executive engineer) अटक केली होती. या कार्यकारी अभियंत्याचं नाव दिनेशकुमार बागुल असं आहे. बागुल यांच्या घरी एसीबीची टीम कसून तपास करतेय. त्यांच्या घरात घबाड आढळून येण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय. त्या अनुशंगाने शोध घेतला जातोय. रात्री उशिरापर्यंत बागुल यांच्या निवासस्थानी एसीबीचं पथक कारवाई करत होतं. गुरुवारी 28 लाख रुपयांची लाच घेताना दिनेशकुमार बागुल यांना रंथेहाथ पकडण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आलेली. ठेकेदाराकडून पैसे मागितल्यानंतर बनावट नोट घेताना दिनेशकुमार बागुल आढळून आले होते. दरम्यान, नाशिकमध्ये करण्यात आलेल्या या कारवाईनंतर आता दिनेशकुमार यांची शेकडो कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार अँटी करप्शनचं पथक पुढील तपास करतंय.

का घेतली लाच?

नाशिकच्या आदिवासी विकास विभागात दिनेशकुमार बागुल कार्यरत आहेत. या विभाता कार्यकारी अभियंता ही जबाबदारी असलेल्या दिनेशकुमार बागुल यांनी एका ठेकेदाराकडे 12 टक्के रक्कम लाच म्हणून मागितली होती. याबाबत ठेकेदाराने जेव्हा एसीबीकडे तक्रार केली, तेव्हा एसीबीने सापळा रचून या कार्यकारी अभियंत्याला रंथेहाथ पकडून अटक केलीय. सेंट्र किचन बिल मंजूर करण्यासाठी दिनेशकुमार यांनी ठेकेदाराकडे लाच मागितली होती. थोडी थोडकी नव्हे, तर तब्बल 28 लाख रुपयांची लाच घेतलाना त्यांना अटक करण्यात आली आहे. जवळपास 15 दिवस सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिकमधील पथकाने ही कारवाई केली.

हे सुद्धा वाचा

गुरुवारी बागुल यांना रंथेहाथ पकडल्यानंतर आता त्यांच्या मालमत्तांवरही कसून तपास केला जातोय. रात्री उशिरापर्यंत त्यांच्या घरी एसीबीच्या पथकाने पाहणी केली. नाशिकमध्ये करण्यात आलेली एसीबीची कारवाई सगळ्यात मोठी कारवाई मानली जातेय. राज्याचं आदिवासी विभागाचं काम हे नाशिकच्या आदिवासी विकास भवनातून चालवलं जातं. आदिवासी विभागामध्ये अशाप्रकारे जर अधिकारी लाच घेऊन काम करत असतील तर त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आता केली जातेय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.