पोलिसांच्या नाकावर टिच्चून नाशिक, मालेगावमध्ये चोरट्यांचा हिवाळीबार; लगातार 6 घरांसह 7 दुकाने फोडली

नाशिकमधील बागलाणच्या नामपूर परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, दोन दिवसांत घरफोड्या आणि दुकानफोड्यांचे सत्र सुरू आहे. चोरट्यांनी लाखोंच्या रकमेसह सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. घरावर पाळत ठेवून या चोऱ्या केल्या जात आहेत. घरी कुणी नसताना कुलूप तोडून ऐवज लंपास केला जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांच्या नाकावर टिच्चून नाशिक, मालेगावमध्ये चोरट्यांचा हिवाळीबार; लगातार 6 घरांसह 7 दुकाने फोडली
नाशिक जिल्ह्यात चोऱ्या वाढल्या आहेत.
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 10:59 AM

नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यात चोरटे अक्षरशः मोकाट सुटलेत. त्यांनी एकाच रात्रीमध्ये सहा घरे आणि सात दुकाने फोडल्याने एकच खळबळ उडालीय. सर्वसामान्य नागरिकांचे धाबे दणाणले असून, पोलीस (Police) करतायत काय, असा सवाल विचारला जात आहे. जिल्ह्यातल्या नामपूरसह मालेगाव आणि इतर ग्रामीण भागात या चोऱ्या (Theft) झाल्या आहेत. मालेगावमध्ये सध्या दररोज मोटारसायकल चोऱ्या सुरूच आहेत. मात्र, आता कॅम्पसह भायगाव परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. त्यांनी रात्रीतून सात दुकांनामध्ये घरफोडी करत लाखोंचा ऐवज लंपास केलाय. विशेष म्हणजे कॅम्प पोलिसांच्या भिंतीला लागूनच असलेल्या दोन दुकानात घरफोडी करून चोरट्यांनी जणू पोलिसांना आव्हानच दिले आहे.

ठाण्याशेजारी चोरी

मालेगावमधील कॅम्प पोलीस ठाण्याशेजारीच असलेल्या साईराम अलंकार व बालाजी भांडारची शटर वाकवून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व मोड लंपास केली. नंतर त्यांनी जाजूवाडी परिसरात मोर्चा वळवत लाखोंचा ऐवज लंपास केला. विशेष म्हणजे चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. त्या आधारावर कॅम्प आणि वडणेर खकुर्डी पोलिसांनी तपास सुरू केलाय. त्यांनी घटनास्थळी जात भेटही दिलीय.

येवल्यात एलईडी लंपास

येवला तालुक्यातील अंदरसूलच्या काळामाथा येथील जीवन फर्निचर दुकानमधून चोरट्यांनी 10 एलईडी लंपास केले आहेत. चोरट्यांनी या फर्निचरच्या दुकानाचा मागील बाजूचा पत्रा वाकून आत प्रवेश केला. तसेच दुकानांमधील जवळपास दोन लाख रुपयांच्या 10 एलईडी टीव्ही चोरून नेल्या. मात्र, ही सर्व घटना सीसीटीव्ही कैद झाली असून, यासंदर्भात येवला तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बागलाण भागातही धुमाकूळ

नाशिकमधील बागलाणच्या नामपूर परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, दोन दिवसांत घरफोड्या आणि दुकानफोड्यांचे सत्र सुरू आहे. चोरट्यांनी लाखोंच्या रकमेसह सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. घरावर पाळत ठेवून या चोऱ्या केल्या जात आहेत. घरी कुणी नसताना कुलूप तोडून ऐवज लंपास केला जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थ करतायत. पूर्वी छोट्या चोऱ्या व्हायच्या. मात्र, आता चक्क दरवाजे तोडण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेलीय. या चोऱ्या रोखणे पोलिसांसमोर आव्हान आहे.

इतर बातम्याः

पब्लिक सब जानती है, कोणावर कशी कारवाई होते, काही लोक भाजपमध्ये का गेले?; भुजबळांचा राणेंना टोला

‘राष्ट्रवादी’कडून इच्छुकांची चाचपणी; नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीचे पडघम जोरात

शिवजयंतीच्या मुहूर्तावर केबल कार्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे उद्घाटन; नाशिकमधून परदेशात होणार निर्यात

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.