Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मालेगावच्या मुन्नाभाईला अटक! दोन खोल्यांमध्ये हॉस्पिटल चालवणाऱ्या बोगस डॉक्टरचा अखेर भांडाफोड

Nashik Bogus Doctor : वैद्यकीय सरावावेळी या मुन्नाभाईने उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाला चक्क खूर्चीत बसवलं आणि सलाईन लावलं होतं. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर मालेगावात खळबळ उडाली होती. अखेर याप्रकरणी रितसर तक्रार करण्यात आली आणि त्यानंतर या बोगस डॉक्टरचा पर्दाफाश करण्यात आलाय.

मालेगावच्या मुन्नाभाईला अटक! दोन खोल्यांमध्ये हॉस्पिटल चालवणाऱ्या बोगस डॉक्टरचा अखेर भांडाफोड
बोगस डॉक्टरला अटकImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 16, 2022 | 8:34 AM

मालेगाव : नाशिक (Nashik crime News) जिल्हायातील मालेगाव (Malegaon) तालुक्यामध्ये एका बोगस डॉक्टरला अटक (Bogus Doctor arrested) करण्यात आली. कोणतीही डिग्री नसताना वैद्यकीस सेवा देणाऱ्या या बोगस डॉक्टरनं चक्क दोन खोलीचं रुग्णालय थाटलं होतं. अखेर या डॉक्टरचं बिंग फुटलं असून त्याच्यावर कारवाई करण्यात आलीय. मालेगावच्या दातार नगर भागात ही घटना उघडकीस आलीय. रुग्णांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि कमाई करणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कठोरातली कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता लोकांकडून केली जाऊ लागली आहे.

कुठलीही वैद्यकीय पदवी नसताना चक्क दोन खोलींचं रुग्णालय उभारणाऱ्या मालेगावातील या मुन्नाभाईचं नाव अन्सारी मोहम्मद वसीम हाजी अब्दुल रशिद असं आहे. मालेगावचा मुन्नभाई असलेल्या या तरुणावर अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. मालेगावच्या पवारवाडी पोलिसांकडून याप्रकरणी पुढील कारवाई सुरु आहे.

वैद्यकीय उपचारासाठी अन्सारी या बोगस डॉक्टरकडे येत असत. तर कोणताही डिग्री नसलेल्या मालेगावच्या या ‘मुन्नाभाई’ने अजब प्रकार केला. त्यामुळे त्याचं बिंग फुटलंय. अखेर मनपा उपायुक्त आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी या बोगस डॉक्टरला रंगेहाथ अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा

पाहा लाईव्ह घडामोडी : Video

वैद्यकीय सरावावेळी या मुन्नाभाईने उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाला चक्क खूर्चीत बसवलं आणि सलाईन लावलं होतं. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर मालेगावात खळबळ उडाली होती. अखेर याप्रकरणी रितसर तक्रार करण्यात आली आणि त्यानंतर या बोगस डॉक्टरचा पर्दाफाश करण्यात आलाय.

मनपा उपायुक्त, आरोग्य अधिकारी आणि पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईनंतर आता अन्सारी मोहम्मज वसीम हाजी अब्दुल रशिद याची आता कसून चौकशी केली जाते आहेत. या बोगस डॉक्टरने दोन खोल्यांचं रुग्णालय थाटलं होतं. त्याठिकाणीही कसून तपास केला जातोय. बोगस डॉक्टरच्या बोगस रुग्णालयातील औषधं, सामान यांची चौकशी आता केली जाईल.

नेमका हा बोगस डॉक्टर कधीपासून हा काळा धंदा करतोय? त्याने असं का केलं? लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या डॉक्टरच्या उपचारांमुळे रुग्णांना नेमका काय अनुभव आला आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याच्या अनुषंगाने पुढील तपास आता केला जातो आहे.

राज ठाकरेंकडे झोलरांनी अनेकदा भीक..संदीप देशपांडेंचा BJP नेत्यावर टीका
राज ठाकरेंकडे झोलरांनी अनेकदा भीक..संदीप देशपांडेंचा BJP नेत्यावर टीका.
त्यांना राग आला म्हणजे कुणाल कामरा खरं बोलला.., अंबादास दानवेंची टीका
त्यांना राग आला म्हणजे कुणाल कामरा खरं बोलला.., अंबादास दानवेंची टीका.
एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणणारा कुणाल कामरा नेमका आहे तरी कोण?
एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणणारा कुणाल कामरा नेमका आहे तरी कोण?.
कोण गद्दार आणि कोण खुद्दार हे जनतेने दाखवून दिलं आहे - मुख्यमंत्री
कोण गद्दार आणि कोण खुद्दार हे जनतेने दाखवून दिलं आहे - मुख्यमंत्री.
माझ्याकडे बंदूक...,माजी आमदाराच्या मुलाची धमकी, सरकारी अधिकारीही भिडला
माझ्याकडे बंदूक...,माजी आमदाराच्या मुलाची धमकी, सरकारी अधिकारीही भिडला.
कुणाल कामराची करामत अन् शिवसेना आक्रमक, शिंदेंवरील 'या' गाण्यामुळं वाद
कुणाल कामराची करामत अन् शिवसेना आक्रमक, शिंदेंवरील 'या' गाण्यामुळं वाद.
'मुंबई पोलीस आयुक्तांची बदली झाली पाहिजे..', संजय राऊतांचा टोला
'मुंबई पोलीस आयुक्तांची बदली झाली पाहिजे..', संजय राऊतांचा टोला.
'ते कधी निवडून...', राज ठाकरेंच्या वक्तव्यावर अजितदादांचा खोचक टोला
'ते कधी निवडून...', राज ठाकरेंच्या वक्तव्यावर अजितदादांचा खोचक टोला.
कल्याणात श्रेयावरून सेनेतच राडा, महिला कार्यकर्ता - माजी नगरसेवकात वाद
कल्याणात श्रेयावरून सेनेतच राडा, महिला कार्यकर्ता - माजी नगरसेवकात वाद.
शिंदेंवरील गाण्यामुळे वाद, कामराला शिवसैनिकांची शिवीगाळ, क्लिप व्हायरल
शिंदेंवरील गाण्यामुळे वाद, कामराला शिवसैनिकांची शिवीगाळ, क्लिप व्हायरल.