माहेरच्या लोकांनी मुलीच्या सासरचं घर पेटवलं! विवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळल्यानंतर नातलगांचा संताप

कार घेण्यासाठी 5 लाख रुपयांची मागणी करत विवाहितेचा छळ केल्याचा आरोप करण्यात आलाय.

माहेरच्या लोकांनी मुलीच्या सासरचं घर पेटवलं! विवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळल्यानंतर नातलगांचा संताप
धक्कादायक!Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 7:48 AM

मालेगाव : मालेगावमध्ये (Malegaon crime) मुलीच्या माहेरच्या नातलगांची तिच्या सासरचं घर पेटवून दिलं. ही धक्कादायक घटना चांदवडच्या काजीसांगवी इथं घडली. सुदैवानं यावेळी घरात कुणीही नव्हतं, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. सोमवारी या मुलीचा मृतदेह विहिरीमध्ये आढळून आला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. यी मुलीची हत्या (daughter murder) करण्यात आली असल्याचा आरोपही तिच्या कुटुंबाकडून गेला जातो आहे. विहिरीचा मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर नातलगांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. यानंतर नातलगांनी मुलीच्या हत्येचा (Murder allegations) आरोप करत तिच्या सासरच्या घरावरच हल्लाबोल केला. चांदवडच्या काजीसांगवीमध्ये घडलेल्या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. एक वर्षापूर्वी या मुलीचं लग्न झालं होतं. त्यानंतर मुलीच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.

हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप…

नाशिकमधल्या चांदवड तालुक्यातील काजीसांगवी गावात हा धक्कादायक प्रकार घडला. कार घेण्यासाठी 5 लाख रुपयांची मागणी करत विवाहितेचा छळ केल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यानंतर या विवाहितेचा मृतदेह चांदवडच्या एका विहिरीत आढळून आला. सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी आपल्या लेकीचा खून केल्याचा आरोप ठाकरे कुटुंबीयांकडून केला जातोय.

अश्विनी ठाकरे असं मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी नवरा,सासू, सासरे आणि 2 नणंदांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी विवाहितेचे वडील रामदास एकनाथ सरोदे यांनी चांदवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अश्विनीचं लग्न 15 फेब्रुवारी 2021 रोजी काजीसांगवी येथील सचिन दिलीप ठाकरेशी झालं. पती सचिन सैन्यात आहे. मात्र, लग्न झाल्यापासून पती सचिन ठाकरे, सासू जयाबाई ठाकरे हे अश्विनीला कार घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत म्हणून त्रास देत होते, असा आरोप करण्यात आला आहे.

पैसे दिले, तरिही…

मुलीचा होणारा छळ पाहून अश्विनीच्या वडिलांनी दीड महिन्यापूर्वी सासरच्या मंडळींना 30 हजार रुपये दिले. तसेच मेव्हणे परशुराम निवृत्ती पवार यांच्याकडून एक लाख रुपये उसने घेऊन सासरे दिलीप ठकाजी ठाकरे यांच्याकडे दिले. मात्र, उर्वरित पैसे न मिळाल्यामुळे अश्विनीचा छळ सुरूच होता. या प्रकरणी नणंद पूनम मनोज गुंजाळ, ज्योती निवृत्ती पगार, वर्षा अमोल शिरसाठ, मामे सासरे बाबूराव रेवजी शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. नाशिक जिल्ह्यात विवाहिता मृत्यूची ही आठवड्यातील दुसरी घटना आहे. यापूर्वी पतीचे संन्यास वेड आणि सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कळवण तालुक्यातल्या अभोणा येथे घडली होती.

पाहा व्हिडीओ : शिक्षण अधिकाऱ्याला अटक

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.