Nashik Murder : भयंकर! नातवाने केला आजीचा खून, हातातील कड्याने आजीच्या चेहऱ्यावर घातला जीवघेणा घाव, आजी जागीच ठार

अत्यंत शुल्लक कारणावरुन आजी आणि नातवात भांडण झालं होतं. या भांडणाचा राग नातवाच्या डोक्यात केला. त्याने संतापाच्या भरात आजीवर हातातील कड्यानेच वार केला. यात आजीच्या उजव्या डोळ्या जवळ गंभीर जखमी झाली.

Nashik Murder : भयंकर! नातवाने केला आजीचा खून, हातातील कड्याने आजीच्या चेहऱ्यावर घातला जीवघेणा घाव, आजी जागीच ठार
हत्या करण्यात आलेली आजी...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 24, 2022 | 8:12 AM

नाशिक : आजीसाठी नातवंडं म्हणजे जीव की प्राण असतो. पण नातचे हवे ते लाड करणाऱ्या आजी आणि नातू या नात्यालाच (Grand son killed grand mother) काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आलीय. नाशिक (Nashik Murder) जिल्ह्यात चक्क नातवानेच आपल्या आजीचा खून केलाय. नाशिक जिल्ह्यातील हरसूलमध्ये (Harsool crime News) ही धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणते हातात असलेल्या कड्यानेच आजीच्या चेहऱ्यावर जोरदार घाव घालत नातवाने आजीचा खून केला. पोलिसांनी आरोपी नातवाला ताब्यात घेतलंय. पण ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ माजलीय. या हत्याकांडप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. गंगाबाई गुरवत असे हत्या करण्यात आलेल्या आजीचं नाव आहे. त्यांचं वय 70 वर्ष होतं. गंगाबाई यांचा नातू दशरथ गुरव याने आपल्या आजीची हत्या केल्यानंतर हरसूल आणि आजूबाजूचा परिसर हादरुन गेला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाच्या दिशेने धाव घेतली. या घटनेप्रकरणी नाशिकमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय.

नेमकं काय झालं?

मंगळवारी सकाळी हे हत्याकांड घडलं. अत्यंत शुल्लक कारणावरुन आजी आणि नातवात भांडण झालं होतं. या भांडणाचा राग नातवाच्या डोक्यात केला. त्याने संतापाच्या भरात आजीवर हातातील कड्यानेच वार केला. यात आजीच्या उजव्या डोळ्या जवळ गंभीर जखमी झाली. नातवाने हातात घातलेलं हे कडं लोखंडी होतं. त्यामुळे त्याने घातलेला घाव किती जबर होता, याची निव्वळ कल्पना केलेली बरी.

नातवाच्या जीवघेण्या घावाने आजी गंभीर जखमी झाली. जागीच गंगाबाई गुरव यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी तातडीने या घटनेबाबत कळताच घटनास्थळ गाठलं आणि गंगूबाई गुरव यांचा मृतदेह पुढील पोस्टमॉर्टेमसाठी रुग्णालयात पाठवला.

हे सुद्धा वाचा

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जनार्दन झिरवाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सहा-साडे सहा वाजण्याच्या दरम्यान, हे हत्याकांड घडलं. सध्या पुढील तपासणीआधी पोलिसांना सगळ्यात आधी पोस्ट मॉर्टेम रिपोर्टची प्रतीक्षा आहे. पोलिसांनी मारेकरी नातवालाही ताब्यात घेतलं असून पुढील तपासही केला जातोय. आजी-नातवाच्या नात्याला काळी फासणाऱ्या या घटनेमुळे सर्वत्र संतपात व्यक्त केला जातोय. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढे नेमकी नातवावर काय कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचंय.

पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.