Nashik | सासूचा अंत्यसंस्कार करून आलेल्या नवविवाहितेला विजेचा शॉक; अर्ध्यावरती डाव मोडिला…!

कचवे कटुंबातील एका ज्येष्ठ महिलेवर अंत्यसंस्कार झाले. त्यानंतर अनेक नातेवाईक आपल्या घरीही पोचले नव्हते. तितक्यात कचवे कटुंबातील सुनेच्या निधनाची वार्ता आली. हे ऐकुण नातेवाईकांनाही धक्का बसला. त्यांनी तात्काळ कचवे यांच्या घराकडे धाव घेतली. नेमके काय झाले, हे ही अनेकांना माहित नव्हते.

Nashik | सासूचा अंत्यसंस्कार करून आलेल्या नवविवाहितेला विजेचा शॉक; अर्ध्यावरती डाव मोडिला...!
विजेच्या धक्क्याने आकांक्षा कचवे या नवविवाहितेचा मृत्यू झाला.
Follow us
| Updated on: Mar 29, 2022 | 9:33 AM

मालेगावः आजेसासूचा अंत्यसंस्कार करून आलेल्या नवविवाहितेचा विजेचा शॉक (electric shock) लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या सावकी (ता. देवळा) येथे घडली आहे. आकांक्षा कचवे असे मृत महिलेचे (woman) नाव आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, आकांक्षा यांचे लग्न दीड वर्षापूर्वी देवळातल्या सावकी येथील कचवे कुटुंबात झाले होते. आकांक्षांच्या आजेसासूचे निधन झाले होते. त्यांचा अंत्यसंस्कार आटोपून आकांक्षा घरी आल्या. कुटुंबातील सगळ्यांनी अंघोळी केल्या. घरातील कपडे धुणे झाल्यानंतर आकांक्षा ते वाळत टाकत होत्या. मात्र, कपडे वाळत टाकण्याच्या तारेत अचानक विजेचा प्रवाह उतरला. याचा जोरदार धक्का आकांक्षाला लागला. त्यांचा या घटनेत जागेवरच मृत्यू झाला. एकाच घरात लागोपाठ असे दोन आघात बसल्यामुळे कचवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. त्यात नवदाम्पत्याचा संसार असा अर्ध्यावर मोडल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कुटुंबावर पसरली शोककळा

कचवे कटुंबातील एका ज्येष्ठ महिलेवर अंत्यसंस्कार झाले. त्यानंतर अनेक नातेवाईक आपल्या घरीही पोचले नव्हते. तितक्यात कचवे कटुंबातील सुनेच्या निधनाची वार्ता आली. हे ऐकुण नातेवाईकांनाही धक्का बसला. त्यांनी तात्काळ कचवे यांच्या घराकडे धाव घेतली. नेमके काय झाले, हे ही अनेकांना माहित नव्हते. मात्र, विजेच्या धक्क्याचा प्रकार समजताच अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली. एकापाठोपाठ एक बसलेल्या आघाताने कुटुंब, नातेवाईक आणि गावावर शोककळा पसरली आहे.

वीज कंपनीचा गलथान कारभार

कचवे कुटुंबात कोसळलेल्या या संकटाला वीज कंपनीचा गलथान कारभार जबाबदार आहे, असा आरोप गावकरी करत आहेत. अशीच घटना नेमकी धुळवडीच्या दिवशी पंढपुरातल्या चळेगावात घडली होती. दुपारच्या सुमारास चळे तालुक्यातील गावात एका शेतकऱ्याने नवीन मोटार घेतली होती. सणाच्या दिवशी मोटार लावण्याचे प्रयोजन होते. यासाठी दोघांना बोलावण्यात आले होते. यावेळी मोटार लावताना पाण्यात विद्युत प्रवाह उतरला. त्यात राजेंद्र सातपुते आणि आनंदा मोरे या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे या दोन्ही तरुणांची कुटुंबे उघड्यावर आली होती. आताही तशीच घटना घडल्याने संताप व्यक्त होतोय.

इतर बातम्याः

शिवसेना नेते यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिलेल्या 2 कोटी रुपयांची यादीच मिळाली; जाधव म्हणतात, ही तर माझी आई…!

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.