Nashik Suicide : तिचा मृतदेह बाहेर काढत होते, तोच दुःख अनावर झालेल्या पतीचीही त्याच डोहात उडी
Nashik Suicide : एकाच वेळी आत्महत्या केलेल्या या दाम्पत्याला दोन मुलंदेखील आहेत. पण मागचा पुढचा कोणताही विचार न करता पत्नीच्या विरहाचं दुःख सहन न झाल्यानं आणि आता करमणार नाही, या विचाराने पतीने देखील आत्महत्या केली.
नाशिक : नाशिक (Nashik Crime News) जिल्ह्यात पतीपतीने आत्महत्या (Suicide) केली. त्यामुळे त्यांच्या दोन मुलांवरील आईवडिलांचं छत्र हरपलं आहे. आता या कोवळ्या वयातील मुलाचं भविष्य काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या हृदयद्रावक घटनेनं हळहळ व्यक्त केली जाते. नाशिक जिल्ह्यातील बागलाण (Baglan Taluka, Nashik) तालुक्यात ही काळीज पिळटून टाकणारी घडना उघडकीस आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील आखतवाडे इथं एका पत्नीने आत्महत्या केली. विहिरीतून उडी टाकून या महिलेनं जीव दिला. ही घटना उघडकीस आल्यानंतर पत्नीचा मृतदेह विहिरीतून काढण्याचं काम सुरु होतं. इतक्यात आत्महत्या केलेल्या पत्नीच्या पतीनेही त्याच विहिरीत उडी टाकली आणि आपली जीवनयात्रा संपवली. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
काळीज सुन्न कऱणारी घटना
रुपाली प्रकाश याळिज आणि प्रकाश शंकर याळिज असं आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचं नाव आहे. बागलाण तालुक्यासह संपूर्ण नाशिक जिल्हा या घटनेनं हादरुन गेला आहे. रुपाली प्रकाश याळिज यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार सुरु होते, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. पत्नीशिवाय आता आपण जगून काय करणार?, या विवंचनेत असताना पतीनेही त्याच वेळी टोकाचं पाऊल उचललं.
आता मुलांचं काय होणार?
महत्त्वाचं म्हणजे एकाच वेळी आत्महत्या केलेल्या या दाम्पत्याला दोन मुलंदेखील आहेत. पण मागचा पुढचा कोणताही विचार न करता पत्नीच्या विरहाचं दुःख सहन न झाल्यानं आणि आता करमणार नाही, या विचाराने पतीने देखील आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर सगळ्यांचाच काळजाचा ठोका चुकलाय.
पाहा लाईव्ह घडामोडी : Video
रुपाली याळिज आणि प्रकाश याळिज यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी आहे. या दोन्ही मुलांच्या डोक्यावरील आई-वडिलांचं छत्र हरपलं आहे. याळिज दाम्पत्याची एकुलती एक धाकटी लेत इयत्ता नववीत शिकते. तर मुलगा मोठा असून तो पदवीच्या दुसऱ्या वर्गात शिक्षण घेतो आहे.
या दोन्ही मुलांच्या भवितव्याचा आता मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. आईवडिलांच्या आत्महत्येनं या दोन्ही मुलांवर मोठा आघात झाला आहे. काळीज सुन्न करणाऱ्या या घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे. आईवडिलांच्या पश्चात आता कोवळ्या वयातील या दोन्ही मुलांचा काय होणार, हा प्रश्न अनेकांना अस्वस्थ करतोय.