Nashik Accident : नवीन कसारा घाटात आयशर ट्रक उलटला! चालकाचा मृत्यू, ट्रकमधील केळ्यांचे ट्रे रस्त्यावर

Nashik Accident News : आपत्ती व्यवस्थापन टीम, महामार्ग पोलिसांना दोन तासाच्या अथक प्रयत्नाननंतर चालकाचा मृतदेह काढण्यात यश आलं. हा मृतदेह कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे.

Nashik Accident : नवीन कसारा घाटात आयशर ट्रक उलटला! चालकाचा मृत्यू, ट्रकमधील केळ्यांचे ट्रे रस्त्यावर
भीषण अपघात...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 22, 2022 | 9:00 AM

नाशिक : नवीन कसारा घाटात (Kasara Ghat) धबधबा पॉइन्टजवळ अपघात झाला असून या अपघातामुळे घाटातील वाहतुकीवर परिणाम झाला. केळ्याने भरलेल्या ट्रकची (Truck Accident News) आयशरला मागून धडक बसली. पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामध्ये ट्रक चालकाचा मृत्यू झालाय. धडक दिल्यानंतर ट्रकही रस्त्यावर पलटी झाला. दरम्यान, ट्रक मधील केळ्यांचे ट्रे महामार्गावर अस्ताव्यस्त पडलेत. दरम्यान, ट्रकचा ड्रायव्हर ट्रक खाली येऊन चिरडला गेल्यानं त्याचा मृत्यू झालाय. पप्पू यादव (Pappu Yadav) असं मृत ट्रक चालकाचं नाव आहे. आपत्ती व्यवस्थापन टीम, महामार्ग पोलिसांना दोन तासाच्या अथक प्रयत्नाननंतर चालकाचा मृतदेह काढण्यात यश आलं. हा मृतदेह कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे. दरम्यान, या अपघातामुळे या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झालीय. ट्रक क्रेनच्या साहाय्याने काढण्याचे काम सुरू असून वाहतूक पूर्वपदावर आणण्याचेही प्रयत्न सुरु आहेत.

अपघातामुळे वाहतूक कोेंडी

कसारा घाटात झालेल्या या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघात झालेल्या ठिकाणावरुन एकाच लेनमधून वाहतूक सुरु ठेवण्यात आली होती. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक धीम्या गतीने सुरु होती. परिणामी मागून येणाऱ्या वाहनांचा खोळंबा होऊन मोठी कोंडी झाली.

हे सुद्धा वाचा

ट्रकमधील केळ्यांचं नुकसान

दरम्यान, ट्रकचा अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक वाहतूक पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचं पथकही घटनास्थळी दाखल झालं. अपघातग्रस्त ट्रकचा चालकही ट्रकखाली आल्यामुळे चिरडला गेला होता. त्याचा मृतदेह अपघातग्रस्त ट्रकमध्ये अडकून होता. तो अथक प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात आला. त्यानंतर रस्त्यावरुन ट्रक हटवण्यासाठीही प्रयत्न करण्यात आले. दरम्यान, या अपघातात ट्रकच्या दर्शनी भागाचं मोठं नुकसान झालं. तर घाट रस्त्यावरच ट्रकमधील केळ्यांचे ट्रे पडले होते. त्यामुळे मोठा आर्थिक फटकाही केळ्यांची वाहतूक करणाऱ्या या ट्रकच्या अपघातामुळे झाला.

वाढत्या अपघातांमुळे चिंता

एकूणच या अपघातामुळे राज्यातील अपघातांचं सत्र काही थांबायचं नाव घेत नसल्याचं दिसून आलं आहे. पहाटेच्या वेळेस घडलेल्या हा अपघात नेमका कशामुळे झाला, हे कळू शकलं नाही. मात्र वाहनावरील नियंत्रण सुटून किंवा चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जाते आहे. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पहाटेच्या वेळेस वाहन चालवताना अधिक सतर्क राहून खबरदारी बाळगण्याची गरजही व्यक्त केली जातेय.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.