एटीएम मशीनच चोरी जाते तेव्हा…, पोलिसांची अशी उडाली तारांबळ

ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. पोलिसांनी पाठलाग केला. चोरट्यांनी एटीएम मशीन फेकून पळ काढला. या घटनेत पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.

एटीएम मशीनच चोरी जाते तेव्हा..., पोलिसांची अशी उडाली तारांबळ
Follow us
| Updated on: Jun 05, 2023 | 6:05 PM

उमेश पारीक, प्रतिनिधी, लासलगाव (नाशिक) :  चोरीच्या घटना घडतात. मात्र लासलगाव येथे चक्क एटीएम उचलून नेल्याची घटना घडली. एटीएम मशीन उचलण्यासाठी चौघांनी एकमेकांची साथ दिली. मशीन काढले. त्यानंतर चार चाकी गाडीत टाकले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. पोलिसांनी पाठलाग केला. चोरट्यांनी एटीएम मशीन फेकून पळ काढला. या घटनेत पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद

कांद्याची नगरी म्हणून ओळख असलेल्या लासलगाव येथील विंचूर रोडवर चोरीची घटना घडली. ॲक्सिस बँकेच्या शेजारीच असलेल्या एटीएम हे पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास चोरट्यांनी लंपास केले. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले.

lasalgaon 2 n

हे सुद्धा वाचा

चार चोरटे चारचाकी गाडी घेऊन या एटीएम मशीनजवळ आले. दोन जणांनी एटीएम मशीन हलवून पाहिले. एटीएम मशीन उचलून चारचाकी गाडीत मांडले. चौघांनी एटीएम मशीन चारचाकी गाडी टाकून तेथून पोबारा केला.

सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांचा तपास

मात्र एटीएम मशीन चोरी झाल्याचे अलर्ट बँकेच्या हेडला कळले. त्यांनी त्वरित लासलगाव पोलिसांना माहिती दिली. त्वरित लासलगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्हीच्या आधारे गाडी कोणत्या दिशेने गेली ही बाब लक्षात घेतली.

हवालदार योगेश शिंदे, पोलीस नाईक सुजय बारगळ यांनी त्वरित सीनेस्टाईल पाठलाग केला. मात्र पोलीस येत असल्याचे चोरट्यांच्या लक्षात आल्याने चोरट्यांनी गाडीतून एटीएम मशीन ढकलून दिले. तेथून पळ काढला. पोलिसांनी एटीएम मशीन ताब्यात घेतले.

याबाबत लासलगाव पोलीस स्थानकात संबंधित चोरट्यांचा अधिक तपास सुरू आहे. या चोरीच्या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी घटनास्थळाची पाहणी केली. अधिक तपास लासलगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ करीत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.