Nashik Crime : नाशिकमध्ये 14 घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल, तीन संशयित ताब्यात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या आरोपीपैकी एक संशयित दिवसा घरांची रेकी करायचा, मग तिघे मिळून रात्रीच्या वेळी घरफोडी करायचे. याबरोबरच इतरही गुन्ह्यात हे मास्टर माईंड असल्याचे पोलिसांनी सांगितले. या पकडलेल्या संशयितांकडून अजून काही गुन्हे उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Nashik Crime : नाशिकमध्ये 14 घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल, तीन संशयित ताब्यात
नाशिकमध्ये 14 घरफोडीच्या गुन्ह्यांची उकलImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 10:01 PM

लासलगाव : शहरातील 14 घरफोड्यांची उकल करण्यास नाशिकच्या अंबड पोलिसांना यश आले आहे. यापैकी 13 घरफोडीचे गुन्हे हे अंबड पोलीस स्टेशन हद्दीतील आहेत तर एक सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. या घरफोडी (Burglary)च्या गुन्ह्यातील एका मुख्य संशयितासह 2 साथीदारांना पोलिसांनी ताब्यात (Detained) घेतले आहे. अंबड पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित हे सराईत गुन्हेगार (Criminal) असून त्यांच्यावर उस्मानाबाद, परभणी आदि ठिकाणी देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडून 28 तोळे सोने 2 मोटार सायकल एक ओमनी गाडी असा एकूण 20 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

दिवसा रेकी करायचे, रात्री घरं फोडायचे

अभिषेक विश्वकर्मा असे मुख्य आरोपीचे तर करण कडूसर आणि अभिषेक रजगिरे अशी त्याच्या साथीदारांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या आरोपीपैकी एक संशयित दिवसा घरांची रेकी करायचा, मग तिघे मिळून रात्रीच्या वेळी घरफोडी करायचे. याबरोबरच इतरही गुन्ह्यात हे मास्टर माईंड असल्याचे पोलिसांनी सांगितले. या पकडलेल्या संशयितांकडून अजून काही गुन्हे उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून, गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी पोलीस कडक पावले उचलत आहेत. शहरातील चोऱ्यांच्या घटना कमी करण्यासाठी पोलिसांनी चोरट्यांची उचलबांगडी करण्यास सुरुवात केली आहे. (Police have arrested three criminals involved in 14 burglaries in Nashik)

हे सुद्धा वाचा

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.