घरी सोडण्याच्या बहाण्याने बसस्टॉपला थांबलेल्या तरुणीवर बलात्कार, आरोपीला 10 वर्षांचा कारावास, नाशिक न्यायालयाचा निकाल

अल्पवयीन मुलीला आपल्या घरी नेवून बलात्कार करणाऱ्या तरुणास नाशिक जिल्हा न्यायालयाने दहा वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सागर दिलीप भोये असं या आरोपीचं नाव आहे. (Rapist accused sentenced to 10 years imprisonment, Nashik court verdict)

घरी सोडण्याच्या बहाण्याने बसस्टॉपला थांबलेल्या तरुणीवर बलात्कार, आरोपीला 10 वर्षांचा कारावास, नाशिक न्यायालयाचा निकाल
अल्पवयीन मुलीला आपल्या घरी नेवून बलात्कार करणाऱ्या तरुणास नाशिक जिल्हा न्यायालयाने दहा वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
Follow us
| Updated on: Jul 03, 2021 | 10:53 AM

नाशिक : अल्पवयीन मुलीला आपल्या घरी नेवून बलात्कार करणाऱ्या तरुणास नाशिक जिल्हा न्यायालयाने दहा वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सागर दिलीप भोये असं या आरोपीचं नाव असून बसस्टॉपला थांबलेल्या तरुणीवर दिंडोरी तालुक्यातील मांदाने येथे घरी नेऊन दिलीपने बलात्कार केला होता. (Rapist accused sentenced to 10 years imprisonment, Nashik court verdict)

दहा वर्षांचा कारावास

3 ऑक्टोबर 2017 रोजी आपल्या घरी जाण्यासाठी वणी बस स्थानकात मुक्कामी बसची प्रतीक्षा करत असताना आरोपींने संबंधित तरुणीला घरी सोडण्याच्या बहाण्याने आपल्या गाडीवर बसवलं. मात्र गाडी तिच्या घरी न नेता, स्वत:च्या घरी नेली. आता उशीर झालाय, असं सांगत तिला आपल्याच घरी मुक्कामाला थांबवली आणि रात्री बळजबरीने बलात्कार केला. याप्रकरणी आरोपीला नाशिक जिल्हा न्यायालय दहा वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

घटना नेमकी काय?

3 ऑक्टोबर 2017 रोजी संबंधित तरुणी वनी बस स्थानकात मुक्कामी बसची प्रतीक्षा करत थांबली होती. बसस्थानकात एकटी मुलगी बघून भामट्याने तिला गाठली आणि तुला मी घरी सोडतो अशा बहाण्यानं दुचाकीवर बसवलं. मंदाणा येथे मुलीच्या घरी जाण्याऐवजी त्याने मुलीला आपल्या घरी नेलं. तसंच उशीर झाला असा बहाणा सांगून रात्री मुक्कामी थांबवलं. मात्र मुलीसोबत रात्री घात झाला. मध्यरात्रीच्या सुमारास अल्पवयीन मुलीवर त्याने बलात्कार केला.

दुसऱ्या दिवशी मुलीने वणी पोलीस स्टेशन गाठून घडलेला सगळा प्रकार पोलिसांसमोर कथन केला. पोलिसांनी आरोपीविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक म्हणजेच पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. बी. सानप यांनी केला.

न्यायालयाच्या निकालपत्रात काय?

आता जवळपास चार वर्षांनी नाशिक न्यायालयाने आरोपीला दहा वर्ष कारावासाची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे. तसंच दंड न भरल्यास तीन महिन्यांची साधी शिक्षा सुनावली आहे, असं निकालपत्रात नमूद करण्यात आलंय.

(Rapist accused sentenced to 10 years imprisonment, Nashik court verdict)

हे ही वाचा :

सहा वर्षांपासून मोक्का गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपींना श्रीगोंदा पोलिसांच्या बेड्या

सहा महिन्यांपूर्वी लग्न, नवदाम्पत्यास चोरट्यांची बेदम मारहाण, पतीचा मृत्यू, पत्नीची मृत्यूशी झुंज, औरंगाबाद हादरलं!

सोशल मीडियावर मैत्री, नंतर प्रेमविवाह, आठ महिन्यांची मुलगी, तरीही जीवापाड प्रेम करणाऱ्या जोडीदाराने पत्नीला का संपवलं?

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.