Igatpuri Murder : भांडण सोडवायला गेली अन् जिवानिशी गेली, इगतपुरीत मायलेकांच्या वादात शेजारणीची हत्या

हत्या केल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले. हत्येबाबत इगतपुरी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. घटनास्थळावरून चॉपर आणि चाकू ताब्यात घेतले आहे.

Igatpuri Murder : भांडण सोडवायला गेली अन् जिवानिशी गेली, इगतपुरीत मायलेकांच्या वादात शेजारणीची हत्या
भांडण सोडवायला गेली अन् जिवानिशी गेलीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 19, 2022 | 11:47 PM

इगतपुरी : मायलेकांमधील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिले (Women)ची धारदार शस्त्राने वार करुन हत्या (Murder) केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री इगतपुरी शहरातील गायकवाड नगर येथे घडली आहे. जकीया शेख असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. मुख्य आरोपी आणि त्याच्या आईचे भांडण झाले होते. ते सोडवण्यासाठी मयत महिला गेली होती. मात्र वाद अधिकच वाढत गेला आणि आरोपीने आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने महिलेची हत्या केली. घटनेनंतर सर्व सातही आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले. याप्रकरणी इगतपुरी पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार आरोपींना अटक (Arrest) केले असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

काय आहे प्रकरण ?

हत्याकांडातील मुख्य आरोपी आणि त्याच्या आईमध्ये भांडण झाले होते. यानंतर त्याच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आई पोलीस ठाण्यातून परत आल्यानंतर पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. यानंतर आरोपीने त्याच्याच चाळीत राहणाऱ्या जकीया शेख यांना आईला समजावण्यासाठी बोलावून घरी नेले. यावेळी आरोपीचे अन्य साथीदारही घरी उपस्थित होते. सर्व दारुच्या नशेत तर्र होते. जकीया यांनी मायलेकातील भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र परिस्थिती अधिकच चिघळली. यामुळे रागाच्या भरात मुख्य आरोपीने आपल्या अन्य सहा साथीदारांसोबत मिळून जकीया यांच्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्यांची हत्या केली.

चौघांना अटक करण्यात यश, तिघांचा शोध सुरु

हत्या केल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले. हत्येबाबत इगतपुरी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. घटनास्थळावरून चॉपर आणि चाकू ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत पुढील कारवाई सुरु केली. पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे फिरवत आरोपींचा शोध सुरु केला असून, चौघांना अटक केली आहे. या हत्येने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या सात महिन्यातील ही तिसरी खुनाची घटना आहे. घटनास्थळी पोलीस उपअधिक्षक अर्जुन भोसले यांनी पाहणी केली आहे. या घटनेमुळे शहरात भितीचे वातावरण आहे. पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक अन्य आरोपींचा शोध घेत आहे. (The woman who went to settle the quarrel between mother and son was killed in Igatpuri)

हे सुद्धा वाचा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.