Nashik Theft : इगतपुरीत ज्वेलर्सच्या दुकानात चोरी, अडीच लाखांचा ऐवज लंपास

श्रीरामवाडी येथे योगेश प्रकाश उदावंत यांचे अंबिका ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. आज पहाटे या दुकानात चोरी झाली. ओळख पटू नये यासाठी अज्ञात चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही यंत्रणा निकामी केली.

Nashik Theft : इगतपुरीत ज्वेलर्सच्या दुकानात चोरी, अडीच लाखांचा ऐवज लंपास
इगतपुरीत ज्वेलर्सच्या दुकानात चोरीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 8:06 PM

इगतपुरी : घोटी शहरातील श्रीरामवाडी भागातील दाट लोकवस्तीच्या भागात अंबिका ज्वेलर्स ह्या दुकानात चोरी (Theft) झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. पहाटेच्या सुमाराला ही घटना घडली असून चोरट्यांनी सीसीटीव्ही (CCTV) यंत्रणा बंद केल्याचे दिसून आले आहे. यामध्ये किमान 2 लाख 50 हजारांच्या पुढे चोरी झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याप्रकरणी घोटी पोलीस (Ghati Police) ठाण्यात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच घोटी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांनी उपस्थित होऊन पोलिसांना तपासकार्याबाबत मार्गदर्शन केले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. भरवस्तीत झालेल्या चोरीमुळे नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

ओळख पटू नये म्हणून सीसीटीव्ही यंत्रणा निकामी केली

पोलिसांकडून तपासाची चक्रे सुरु झाली असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे सांगण्यात आले. चोरीबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. श्रीरामवाडी येथे योगेश प्रकाश उदावंत यांचे अंबिका ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. आज पहाटे या दुकानात चोरी झाली. ओळख पटू नये यासाठी अज्ञात चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही यंत्रणा निकामी केली. या घटनेत किमान अडीच लाखांचा ऐवज चोरी झाल्याची शक्यता आहे. घोटीचे पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी कसून तपास सुरु केला आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. आजूबाजूच्या सीसीटीव्हीद्वारे पोलीस संशयित चोरट्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. (Theft in a jewelers shop in Igatpuri, two and a half lakhs gold was stolen)

हे सुद्धा वाचा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.