Video : मालेगावातील सटाणा रोडचा डेंजर झोन, एकाच ठिकाणी 3 दिवसात 3 अपघात, अपघाताची दृश्य CCTV त कैद

| Updated on: Apr 03, 2022 | 9:15 PM

सदर ठिकाणी मोसम पुलाकडून सटाण्याच्या दिशेने जाणारी अनेक वाहने अत्यंत वेगाने जात असतात. तसेच रस्ता ओलांडताना कंट्रोल न झाल्याने बरेच अपघात घडत असतात. याठिकाणी अनेक रस्ते येऊन या मुख्य रस्त्याला मिळत असल्याने सदर ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी नागरिकांतर्फे करण्यात आली आहे.

Video : मालेगावातील सटाणा रोडचा डेंजर झोन, एकाच ठिकाणी 3 दिवसात 3 अपघात, अपघाताची दृश्य CCTV त कैद
मालेगावातील सटाणा रोडचा डेंजर झोन, एकाच ठिकाणी तीन दिवसात तीन अपघात
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मालेगाव : गेल्या काही दिवसांपासून मालेगाव व परिसरात अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अपघातातील मृतांची संख्या ही पूर्वीपेक्षा वाढल्याने हा चिंतेचा विषय बनत चालली आहे. रस्त्यावरील अतिक्रमण, भर रस्त्यात पार्किंग आणि मर्यादित नसलेला वेग हे प्रमुख कारण असले तरी यामध्ये केवळ वाहनधारकांचीच चूक नाही हे स्पष्टपणे लक्षात येत आहे. सटाणा रोडवरील डॉ. बडवे यांच्या दवाखान्याजवळ गुरुदत्त स्टील फर्निचर समोर तीन दिवसात तीन वेगवेगळे अपघात (Accident) झाले आहेत. सदर घटना सीसीटीव्ही (CCTV)मध्ये कैद झाली असून या ठिकाणी प्रशासनाने लक्ष देण्याची वेळ आली आहे. (Three accidents in three days at the same place on Satana Road in Malegaon)

सुदैवाने अपघातात जीवितहानी नाही

पहिल्या अपघातात शतपावली करणाऱ्या नागरिकाला चारचाकी वाहनाने उडवले. त्यामुळे त्याला जखमी अवस्थेत खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसऱ्या अपघातात एका रिक्षाचालकाने दुचाकीस्वाराला मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाला. त्याच्यावरही खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिसऱ्या अपघातात एका दुचाकीस्वाराला रस्ता ओलांडताना एका चारचाकी वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार रस्त्यावर जाऊन पडला. सुदैवाने सदर इसमाला किरकोळ जखमा झाल्याने आजूबाजूच्या लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला.

गतिरोधक बसविण्याची नागरिकांची मागणी

सदर ठिकाणी मोसम पुलाकडून सटाण्याच्या दिशेने जाणारी अनेक वाहने अत्यंत वेगाने जात असतात. तसेच रस्ता ओलांडताना कंट्रोल न झाल्याने बरेच अपघात घडत असतात. याठिकाणी अनेक रस्ते येऊन या मुख्य रस्त्याला मिळत असल्याने सदर ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी नागरिकांतर्फे करण्यात आली आहे. (Three accidents in three days at the same place on Satana Road in Malegaon)

इतर बातम्या

Mumbai ATM Loot : गोरेगावमधील एसबीआयचे एटीएम लुटणाऱ्या दोघांना अटक

Buldhana Crime : दरोडा टाकण्याच्या बेतात असलेल्या आठ जणांना अटक, स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलिसांची संयुक्त कारवाई