Malegaon wall Collpase : मालेगावात भिंत कोसळल्याने तीन मुलांचा ढिगाऱ्याखाली दबली, सुदैवाने जीवितहानी नाही

मालेगाव शहरातील हुसैनिया मशिदीजवळील मोकळ्या जागेवर बांधलेली भिंत आज कोसळली. त्यामुळे येथे खेळणारी तीन निष्पाप मुले ढिगाऱ्याखाली गाडली गेली. हे दृश्य पाहताच स्थानिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली.

Malegaon wall Collpase : मालेगावात भिंत कोसळल्याने तीन मुलांचा ढिगाऱ्याखाली दबली, सुदैवाने जीवितहानी नाही
मालेगावात भिंत कोसळल्याने तीन मुलांचा ढिगाऱ्याखाली दबलीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 9:13 PM

मालेगाव : सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जीर्ण झालेली सुरक्षा भिंत कोसळून (Wall Collapsed) तीन मुले ढिगाऱ्याखाली दबल्याची घटना नाशिकमधील मालेगावमध्ये घडली आहे. तीनही मुलांना ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढण्यात आले असून, तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तीनही मुले 10 ते 12 वयोगटातील आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी (Casualty) झाली नाही. अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत, मदतकार्य (Relief Work) सुरु केले. राज्यात पावसाचा जोर सुरु आहे. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अशा दुर्घटना घडत आहेत. पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्याची विशेष गरज आहे.

ढिगाऱ्याखालून मुलांना सुखरुप बाहेर काढले

मालेगाव शहरातील हुसैनिया मशिदीजवळील मोकळ्या जागेवर बांधलेली भिंत आज कोसळली. त्यामुळे येथे खेळणारी तीन निष्पाप मुले ढिगाऱ्याखाली गाडली गेली. हे दृश्य पाहताच स्थानिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. मालेगाव मनपाच्या अग्निशमन दलाच्या जवानांना कळवण्यात आले. स्थानिकांनी आणि अग्निशमन विभागाच्या लोकांनी मुलांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तिन्ही मुलांना तरुणांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले आणि त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

काल रात्री शाळेची भिंत कोसळली

मालेगावात मनपा शाळांची दुरावस्था झाली असून, अनेक इमारती जीर्ण झाल्या आहेत. त्यात राज्यात मान्सूनचा जोर सुरु आहे. पावसामुळे मालेगावातील ईलाईट शाळेची भिंत कोसळल्याची घटना काल रात्री घडली. घटना रात्रीच्या वेळी घडल्याने कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाले नाही. मनपा शाळांची दयनीय अवस्था पाहता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत आहे. (Three children were buried under the rubble after a wall collapsed in Malegaon)

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.