Malegaon Youth Drowned : मालेगावात तीन मित्र तलावात बुडाले, एकाच आठवड्यात पाच तरुणांचा बुडून मृत्यू
शुक्रवारी सुट्टी असल्यामुळे तिघे फिरायला गेल्यावर पोहण्यासाठी तिघे तलावात उतरले होते. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. एका आठवड्यात पाच तरुणांचा बुडून झाल्यामुळे शहरावर शोककळा पसरली आहे.
मालेगाव : मालेगावात पाण्यात बुडून मृत्यू होण्याच्या घटना सुरूच आहेत. पुराच्या पाण्यात दोन तरुण वाहून गेल्याची घटना ताजी असतानाच आज तीन मित्र तलावा (Lake)त बुडाले. दरेंगाव शिवारात असलेल्या दरेगाव शिवारात सायतर सायतरपाड्याजवळ असलेल्या तलावात ही घटना घडली. नुमान शेख, अखतर शेख आणि शेख मेहफुज अशी बुडालेल्या तिघांची नावे असून, तिघांचे मृतदेह (Deadbody) काढण्यात तैराक ग्रुपला यश आले आहे. शुक्रवारी सुट्टी असल्यामुळे तिघे फिरायला गेल्यावर पोहण्यासाठी तिघे तलावात उतरले होते. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तिघांचा बुडून (Drowned) मृत्यू झाला आहे. एका आठवड्यात पाच तरुणांचा बुडून झाल्यामुळे शहरावर शोककळा पसरली आहे.
पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाले
मालेगाव शहराच्या पूर्वेला वन विभागाचे उद्यान आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक फिरण्यासाठी जात असतात. शुक्रवारी सुट्टी असल्याने नुमान शेख, अखतर शेख आणि शेख मेहफुज हे तिघे फिरण्यासाठी गेले होते. त्याआधी त्यांनी हॉटेल रॉयलमध्ये जेवण केले आणि नंतर उद्यानात फिरायला गेले. उद्यानाजवळ एक तलाव आहे. या तलावात पोहण्याचा मोह त्यांना आवरला नाही. तिघेही तलावात पोहण्यासाठी उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही तलावात बुडाले. तिघे तरुण बुडत आहेत हे स्थानिक नागरिकांनी पाहिले. नागरिकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्नही केला, मात्र त्यांना यश आले नाही.
मोसम नदीच्या पुलावरुन दोन तरुण वाहून गेले
मालेगाव शहरातील द्याने व श्रीराम नगर यांना जोडणाऱ्या मोसम नदीवरील फरशी पुलावरून दुचाकी नेण्याचा प्रयत्न दोघा तरुणांच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना काल घडली. समोरून पुलावर ट्रक आल्याने कठडे नसलेल्या फरशी पुलावरून तोल गेल्याने दोघे तरुण दुचाकीसह पुलावरून नदीपात्रात पडून पुराच्या प्रवाहात वाहून गेले. अब्दुल रहीम पठाण (16) आणि शहजात जाकीर शेख (19) अशी वाहून गेलेल्या तरुणांची नावे आहेत. तरुणांना पुराच्या पाण्यात वाहून जाताना पाहताना तेथे उपस्थित नागरिकांनी आरडाओरडा केला. मात्र पुराच्या पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने त्यांना वाचविण्याचे धाडस कोणी केले नाही. (Three friends drown in a lake in Malegaon, five youths death in a single week)