Nashik Trakkers Death : चांदवडला ट्रेकिंग करताना तिघे ट्रेकर्स कोसळले, शेंडी डोंगरावरून पडून 2 ठार 1 जखमी
सर्व ट्रेकर्स अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असून हे सर्व जण हबडीची शेंडी येथे आरोहन कार्यक्रमासाठी आले होते. अहमदनगरमधील इंद्रप्रस्थ ट्रेकर्सच्या वतीने या आरोहण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत 8 मुली व 7 मुलगे सहभागी झाले होते.
नाशिक : चांदवड तालुक्यातील हबडीच्या शेंडी डोंगरावर ट्रेकिंग करताना तीन ट्रेकर्स(Trackers) डोंगरावरुन कोसळल्याची घटना घडली आहे. तिघांपैकी दोन तरुण ठार झाले असून 1 जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रॅपलिंग(Rappelling) करताना डोंगरावरुन तिघे कोसळल्याची घटना घडली. अहमदनगर येथून 8 मुली व 7 मुले असे एकूण 15 जण ट्रेकिंग करण्यासाठी या शेंडीच्या डोंगरावर आले होते. यावेळी ही घटना घडली आहे. अनिल वाघ आणि मयुर मस्के अशी मयतांची नावे आहेत तर प्रशांत पवार असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बाकी ट्रेकर्स सुखरूप आहे. रापली, कातरवाडी, मनमाड शहरातील तरुणांनी अन्य 12 ट्रेकर्सची सुखरुप सुटका केली आहे. (Three trekkers fell while trekking to Chandwad, fell from Shendi hill, killing 2 and injuring 1)
हबडीची शेंडी येथे आरोहण मोहिमेत सहभागी होण्यासाठी आले होते
सर्व ट्रेकर्स अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असून हे सर्व जण हबडीची शेंडी येथे आरोहन कार्यक्रमासाठी आले होते. अहमदनगरमधील इंद्रप्रस्थ ट्रेकर्सच्या वतीने या आरोहण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत 8 मुली व 7 मुलगे सहभागी झाले होते. आरोहण मोहिम झाल्यानंतर सरेव ट्रेकर्सला खालच्या टप्प्यावर उतरविण्यात आले. शेवटी अनिल वाघ, मयुर मस्के आणि प्रशांत पवार हे तिघे जण खाली उतरत असताना खाली कोसळले. यापैकी अनिल वाघ आणि मयुर मस्के हे दोघे ठार झाले तर प्रशांत पवार जखमी झाला. जखमी प्रशांत पवारला मनमाड येथे उपचारासाठी नेण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच कातरवाडी ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. सर्व ट्रेकर्सना सुखरुप खाली उतरवण्यात आले.
वसईत टेम्पो आणि मोटारसायकलचा भीषण अपघात
वसईत टेम्पो आणि मोटारसायकलचा भीषण अपघात झाल्याची घटना बुधवारी घडली आहे. कोंबडे घेऊन भरघाव वेगात जाणाऱ्या टेम्पोने दुचाकीस्वाराला उडविले आहे. वसईच्या रानगाव येथे बुधवारी सकाळी 6.50 ला ही दुर्दैवी घटना घडली आहे. यात मोटारसायकलवरील पाठीमागे बसलेल्या एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर मोटारसायकल चालकाने हेल्मेट घातलेले असल्याने त्याचा जीव वाचला आहे. या अपघाताचा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. नारायण राघो मेहेर (54) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून, ते वसईच्या वर्तक इंजिनिअर कॉलेज येथे शिपाई म्हणून कार्यरत होते. परेश मेहेर असे जीव वाचलेल्या मोटारसायकल चालकाचे नाव आहे. या अपघाताची वसई पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. (Three trekkers fell while trekking to Chandwad, fell from Shendi hill, killing 2 and injuring 1)
इतर बातम्या
Pune TET : टीईटी घोटाळा प्रकरण : आयएएस अधिकारी सुशील खोडवेकरचा अंतरिम जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
Thane Crime : बोगस कॉल सेंटरद्वारे अमेरिकन नागरिकांची फसवणूक, गुन्हे शाखेकडून 6 जणांना अटक