Nashik Youth Collapse : नाशिकच्या बागलाणच्या साल्हेर किल्ल्यावरुन दोन पर्यटक दरीत कोसळले, एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर

राज्यात सध्या पावसाचे थैमान सुरु आहे. जिल्ह्यात सर्वदूर पावसाचे आगमन झाल्यामुळे निसर्ग पर्यटन वाढले आहे. बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्ल्यावर मालेगाव येथील 12 तरुणांचा एक ग्रुप पर्यटनासाठी आलेला होता.

Nashik Youth Collapse : नाशिकच्या बागलाणच्या साल्हेर किल्ल्यावरुन दोन पर्यटक दरीत कोसळले, एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर
नाशिकच्या बागलाणच्या साल्हेर किल्ल्यावरुन दोन पर्यटक दरीत कोसळलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 10:34 PM

मालेगाव : नाशिकच्या बागलाण तालुक्यातील शिवकालीन साल्हेर किल्ल्यावरुन दोन पर्यटक (Tourist) पाय घसरुन पडल्याची घटना आज दुपारी घडली. या दुर्घटनेत एका पर्यटकाचा मृत्यू (Death) झाला तर दुसरा गंभीर जखमी (Injured) झाला आहे. त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भावेश शेखर अहिरे (21) असे मयत तरुणाचे नाव आहे. तर मनिष सुनील मुठेकर (21) असे जखमी तरुणाचे नाव आहे. पावसामुळे वाटा निसरड्या झाल्या आहेत. त्यामुळे चढताना पाय घसरला. पावसाळ्यातील दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून पर्यटन स्थळांवर मनाई आदेश जारी करण्यात आले असतानाही पर्यटक आदेश झुगारुन जात आहेत.

मालेगाव येथील तरुणांचा ग्रुप पिकनिकसाठी आला होता

राज्यात सध्या पावसाचे थैमान सुरु आहे. जिल्ह्यात सर्वदूर पावसाचे आगमन झाल्यामुळे निसर्ग पर्यटन वाढले आहे. बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्ल्यावर मालेगाव येथील 12 तरुणांचा एक ग्रुप पर्यटनासाठी आलेला होता. या ग्रुपने अवघड समजल्या जाणाऱ्या साल्हेर वाडीकडून उघड्या दरवाजाकडून किल्ल्याच्या चढाईला सुरुवात केली होती. येथील अतिशय अवघड अशा 65 पायऱ्या आहेत. याच ठिकाणाहून भावेश अहिरे आणि मनिष मुठेकर हे दोन तरुण पाय घसरुन दरीत पडले. यात भावेशचा जागीच मृत्यू झाला तर मनिषला गंभीर दुखापत झाली असून त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाचे मनाई आदेश झुगारुन हे तरुण अशा अवघड ठिकाणी पिकनिकसाठी आले होते. (Two tourists fell into the valley from Salher Fort in Baglan Nashik)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.