Video | दानपेटीतील रक्कम चोरता आली नाही म्हणून दानपेटीच पळवली, मालेगावातील महादेव मंदिरात खळबळ

Malegaon CCTV Video Temple Theft : दोघेजण मिळून चोरी करत असल्याचं सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये दिसून आलं आहे. या दोघांनाही वजनदार असलेली मंदिरातील दानपेटी उचलताना घामही फुटला होता.

Video | दानपेटीतील रक्कम चोरता आली नाही म्हणून दानपेटीच पळवली, मालेगावातील महादेव मंदिरात खळबळ
महादेव मंदिरातील दानपेटी चोरीला!Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 21, 2022 | 9:58 PM

मालेगाव : मंदिरात चोरी (Temple Theft) होण्याचे प्रकार नवे नाहीत. मंदिरांच्या दानपेटीतील पैसे चोरी होण्याच्या घटना याआधीही घडलेल्या आहेत. मात्र काही भामट्यांनी तर चक्क मंदिरातील दानपेटीच पळवली आहे. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद झाली आहे. सुरुवातीला या चोरट्यांना दान पेटीतील रक्कम चोरण्यासाठी प्रयत्न केलेही. मात्र यश येत नाही, हे कळल्यानंतर चक्क दानपेटीच पळवून नेली आहे. चोरी करुन दानपेटी पळवणारे हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर आता या फुटेजच्या मदतीनं त्यांचा शोध घेतला जातो आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Malegaon Police) गुन्हा देखील दाखल करुन घेतला आहे. सध्या हे चोर फरार असून पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी पथकं तैनात केली आहे.

मालेगावात कुठे झाली चोरी?

मालेगावातील नांदगावच्या जातेगावमध्ये ही चोरी झाली. जातेगावातील महादेव मंदिरात शिरुन चोरट्यांनी मंदिराच्या दानपेटीवर डल्ला मारला. यावेळी चोरट्यांनी आधी मंदिरातील दानपेटी उघण्यासाठी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रयत्न सुरु केले. मात्र दानपेटी उघडत नाही, हे लक्षात आल्यानंतर चोरांची चक्क मंदिरातील दानपेटीच उचलून चोरुन नेली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

दोघेजण मिळून चोरी करत असल्याचं सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये दिसून आलं आहे. या दोघांनाही वजनदार असलेली मंदिरातील दानपेटी उचलताना घामही फुटला होता. दोघांच्याही चेहऱ्यावर कपडा असल्यानं त्यांचे चेहरे सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसून येत नाहीत.

दानपेटी जंगलात फेकून दिली

सध्या या चोरीप्रकरणी पोलिसांनी गुन्दा दाखल केला आहे. दानपेटीतील रक्कम चोरुन पसार झालेल्या या चोरट्यांनी दानपेटी जंगलात फेकून दिली होती. ही दानपेटी आढळून आल्यानंतर आता पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचं आव्हान उभं ठाकलंय.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

मोबाईल खेचून पळाला, अन पोलिसांच्या जाळ्यात सापडला!, उल्हासनगरात चोरटा अटकेत

सांगलीत काळीज चर्रर्र करणारा अपघात, 7 कि.मी. पर्यंत चिमुकल्याला फरफटत नेलं, पब्लिक संतप्त

Amaravati Poisoning : अमरावतीत सकाळचं जेवण रात्री खाल्ल्याने 25 जणांना विषबाधा, चौघांची प्रकृती गंभीर

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.