Nashik Crime : लग्न मोडल्याच्या रागातून प्रेयसीने घरच्यांच्या मदतीने पहिल्या प्रियकराला जिवंत जाळले, मुलीसह पाच जण पोलिसांच्या ताब्यात

मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथील रहिवासी असलेल्या मुलीचे देवळा तालुक्यात लोहणेर येथील गोरख बच्छाव सोबत सात वर्षापासून प्रेमसंबंध होते. दोघेही नातेसंबंधातील असल्याचे बोलले जाते. मात्र दोन महिन्यांपूर्वीच त्यांचे ब्रेक अप झाले होते. ब्रेक अप का झाले ते कळू शकले नाही. दोघांच्या ब्रेकअपनंतर मुलीचे दुसरीकडे लग्न ठरले होते. मात्र काही कारणाने हे लग्न मोडले.

Nashik Crime : लग्न मोडल्याच्या रागातून प्रेयसीने घरच्यांच्या मदतीने पहिल्या प्रियकराला जिवंत जाळले, मुलीसह पाच जण पोलिसांच्या ताब्यात
नाशिकमधील देवळा जळीतकांड
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 5:04 PM

नाशिक : प्रेम प्रकरणा (Love Affair) तून मुलगी आणि तिच्या घरच्यांनी एका युवकाला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना नाशिकमधील देवळा तालुक्यात लोहणेर घडली आहे. याप्रकरणी देवळा पोलीस ठाण्या (Devala Police Station)त नोंद करण्यात आली असून, संबंधित मुलीसह पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यात पीडित युवक 55 टक्के भाजला असून त्याच्यावर देवळा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गोरख काशीनाथ बच्छाव असे पीडित तरुणाचे नाव आहे. देवळा पोलिसांनी संबंधित मुलगी, तिचे आई वडिल आणि दोन भाऊ यांना ताब्यात घेतले आहे. यापैकी एक आरोपी अल्पवयीन आहे. पीडित मुलाचे आणि आरोपी मुलीचे प्रेमसंबंध होते. मात्र काही कारणाने दोघांचे ब्रेक अप झाले त्यानंतर मुलीचे दुसरीकडे लग्न ठरले होते. मात्र ते मोडले. याच रागातून पीडित तरुणावर हल्ला करण्यात आला. (Young man burnt alive in Nashik over love affair, Five people, including a girl, are in police custody)

पीडित तरुणाने मुलीचे लग्न मोडल्याच्या संशयातून घटना

मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथील रहिवासी असलेल्या मुलीचे देवळा तालुक्यात लोहणेर येथील गोरख बच्छाव सोबत सात वर्षापासून प्रेमसंबंध होते. दोघेही नातेसंबंधातील असल्याचे बोलले जाते. मात्र दोन महिन्यांपूर्वीच त्यांचे ब्रेक अप झाले होते. ब्रेक अप का झाले ते कळू शकले नाही. दोघांच्या ब्रेकअपनंतर मुलीचे दुसरीकडे लग्न ठरले होते. मात्र काही कारणाने हे लग्न मोडले. त्यामुळे गोरखनेच मुलीच्या सासरच्यांना सांगून लग्न मोडले, असा मुलीला आणि तिच्या घरच्यांना संशय होता. याच संशयातून त्यांनी गोरखला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या आई, वडील व दोन भाऊ यांनी संगनमताने मुलाच्या डोक्यात वार करुन मुलीने अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. यात तरुण 55 टक्के भाजल्याची वैद्यकीय सूत्रांकडून माहिती मिळते. देवळा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत युवकाला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले.

लग्नाचे आमिष दाखवून अमरावतीच्या नर्सवर बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवून जळगावमधील मुक्ताईनगरमधील रहिवासी असलेल्या तरुणाने अमरावतीतील नर्सवर तब्बल पाच महिने बलात्कार केल्याची घटना धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेने अमरावती शहरातील फैजरपूर शहर पोलिस स्टेशनमध्ये संशयित आरोपी भूषण संजयराव तायडे याच्या विरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात शून्य क्रमांकाने वर्ग झाला आहे. याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राहुल बोरकर करत आहे. भूषण संजयराव तायडे असे आरोपीचे नाव आहे.

पीडितेची आणि आरोपीची ओळख एका ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर या ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि मग प्रेमात झाले. त्यानंतर आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवत पाच महिने तिच्यावर बलात्कार केला. तरुणी वारंवार आरोपीकडे लग्नाची मागणी करीत होती. मात्र आरोपी टाळाटाळ करीत होता. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. (Young man burnt alive in Nashik over love affair, Five people, including a girl, are in police custody)

इतर बातम्या

धक्कादायक | सोनोग्राफीत चूक, सात महिन्यांची गर्भवती दगावली, नांदेड पोलिसांच्या सतर्कतेमुळे तेलंगणातल्या डॉक्टरांवर गुन्हा!

VIDEO : कल्याणमध्ये घरात घुसून महिलेला मारहाण, दागिने घेऊन अल्पवयीन चोरटे पसार, दोघांची बालसुधारगृहात रवानगी

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.