Malegaon Attack : मालेगावात तरुणावर जीवघेणा हल्ला, कुत्ता गोळीच्या वादातून हल्ल्या झालाचा संशय

अल्प्रालोझम नावाची ही गोळी झोप न येणे व मेंदूशी संबंधित रूग्णाला दिली जाते. ही गोळी खाल्ल्याने स्वत:वरचे नियंत्रण सुटते. एक वेगळीच नशा होत असल्याने या गोळीला कुत्ता गोळी म्हटले जाते. ही टॅब्लेट शेड्युल वन कॅटेगरीत येत असल्याने डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय ही गोळ्या देता येत नाही.

Malegaon Attack : मालेगावात तरुणावर जीवघेणा हल्ला, कुत्ता गोळीच्या वादातून हल्ल्या झालाचा संशय
भंडाऱ्यात मावाच्या वादातून मित्रावर चाकूने प्राणघातक हल्लाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 8:18 PM

मालेगाव : मालेगावमध्ये एका तरुणा (Youth)वर अज्ञात इसमांनी जीवघेणा हल्ला (Attack) करून गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. तरुणाला बेशुद्ध अवस्थेत मुंबई-आग्रा महामार्गावरील ओवाडी नाल्याच्या पुलाखाली फेकून दिले. जमील अहमद अब्दुल जब्बार असे जखमी तरुणाचे नाक असून तो नयपुरा भागातील रहिवासी आहे. त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत (Injured) करण्यात आली आहे. कुत्ता गोळीच्या वादातून हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सदर जखमी तरुणाला पुढील उपचारासाठी धुळे हलविण्यात आले आहे. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहे. मालेगावची तरुण पिढी आता वेगळ्याच नशेच्या विळख्यात सापडली आहे. कुत्ता गोळी असे या नशेचे नाव आहे. कुत्ता गोळीच्या सेवनाने शहरात गुन्हेगारी कारवायांमध्ये वाढ झाली असून तरुण व महाविद्यालयीन जीवन उध्वस्त करणाऱ्या कुत्ता गोळीचे लोन राज्यभर पसरू लागले आहे.

काय आहे कुत्ता गोळी ?

अल्प्रालोझम नावाची ही गोळी झोप न येणे व मेंदूशी संबंधित रूग्णाला दिली जाते. ही गोळी खाल्ल्याने स्वत:वरचे नियंत्रण सुटते. एक वेगळीच नशा होत असल्याने या गोळीला कुत्ता गोळी म्हटले जाते. ही टॅब्लेट शेड्युल वन कॅटेगरीत येत असल्याने डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय ही गोळ्या देता येत नाही. मात्र मालेगाव शहरात या गोळीची सर्रास बेकायदेशीर विक्री होत असून अनेक महाविद्यालयीन विधार्थी व तरुण या नशेच्या आहारी जात आहेत. विशेष करून गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या गोळीचे सेवन करून गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारी कारवाया करीत असल्याचे पुढे आले आहे.

मालेगाव कुत्ता गोळीची बेकायदेशीर विक्री सुरु

मालेगाव शहरात बेकायशीरपणे गोळ्यांची तस्करी होत आहे. सहज या गोळ्या उपलब्ध होत असल्याने शहरवासीयांनी चिंता व्यक्त केली आहे. कुत्ता गोळी विक्री करणारे मोठे रॅकेट यामागे सक्रिय आहे. कुत्ता गोळीमुळे शहरातील गुन्हेगारी कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. सराईत गुन्हेगार कुत्ता गोळीचे सेवन करून गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत असल्याने शहराच्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाबरोबरच तरुण पिढी या जीवघेण्या नशेच्या आहारी जात आहे. (Youth attacked in Malegaon over drug dispute)

हे सुद्धा वाचा

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.