Photo | नातीच्या मांडवात घराला आग; भिंत खचली, चूल विझली, संसार खाक…!
नाशिक जिल्ह्यातल्या लग्नघरात गुरुवारी, 17 फेब्रुवारी रोजी आग लागल्याची घटना घटली. निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे सूर्यभान पांडुरंग जीवरक यांच्या नातीचे लग्न घरासमोर सुरू होते. मात्र, घराला अचानक आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केले. गावकऱ्यांनी फोन करताच 'एचएल' व पिंपळगाव बसवंत येथील अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. त्यांनी आटोकाट प्रयत्न करून आग विझवली. मात्र, तोपर्यंत घरातील मौल्यवान वस्तू व संसार जळून खाक झाला. आगीचे कारण अजून समजले नाही. या घटनेने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
Most Read Stories