अजून मिश्या फुटल्या नाहीत पण Live मारहाण, हत्येनंतर Live कबुली
नाशिकमध्ये दोन गँगवारमध्ये झालेल्या वादामुळे अनेकांना धक्का बसला आहे. एकाचा दिवसाढवळ्या मृत्यू झाला असल्यामुळे नागरिक सुध्दा चिंता व्यक्त करीत आहेत. त्यामुळे पोलिसांनी आता दादागिरी करणाऱ्या तरुणांची चौकशी सुरु केली आहे.
![अजून मिश्या फुटल्या नाहीत पण Live मारहाण, हत्येनंतर Live कबुली अजून मिश्या फुटल्या नाहीत पण Live मारहाण, हत्येनंतर Live कबुली](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/Nashik-crime-news-in-marathi-1.jpg?w=1280)
नाशिक : संदीप आठवले (sandip aathwale) आणि ओम पवार (om pawar) यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. संदीप आठवले या तरुणाचं वय २२ आहे. दोघात शाब्दिक वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, दोघात हाणामारी झाली. त्यावेळी संदीप आठवले यांच्या काही साथीदारांनी ओम पवार या तरुणाला बेदम मारहाण केली. त्यानंतर दोन तरुणांच्या गॅगवारमध्ये भांडणाला सुरुवात झाली. हा प्रकार नाशिक जिल्ह्यातील असून यामुळे पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या प्रकरणातील पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. संदीप आठवले या तरुणावरती धारदार शस्त्राने २५ वार केल्याने त्याचा जागीचं मृत्यू झाला.
व्हिडीओत काय आहे
“ये कोण हाय, कोण हाय (व्हिडीओत मोठा गोंधळ सुरु असल्याचा आवाज येत आहे.) त्याचवेळी काही तरुण जोरात ओरडत आहेत. तर काही तरुण रडत आहेत. ये संदीप भाऊ तुझ्या पडतो भाऊ… कोण हायं सचिन हाय तू, कोण हायं सचिन हाय तू… त्यावेळी समोरचा तरुण जोरात रडत आहे. ही मारहाण सुरु असताना तिथं असलेल्या एका तरुणीने हा व्हिडीओ शूट केला. त्याचबरोबर हा व्हिडीओ संदीप आठवले या तरुणाने आपल्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती शेअर केला.
ओम पवार मनात आपली तयारी करु लागला
व्हिडीओ ज्यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावेळी ओम पवार (आरोपी) हा आतून अधिक दुखावला गेला. त्याचबरोबर त्याच्या मनात दु:खाची भावना तयार झाली. झालेल्या प्रकरणाचा बदला घेण्यासाठी ओम पवार मनात आपली तयारी करु लागला. संदीप आठवले याला संपवायला हवं असा विचार ओम पवार यांच्या डोक्यात सतत फिरत होता. संदीप आठवले आणि ओम पवार या दोन तरुणांमध्ये एकमेकांला संपवण्याची तयारी सुरु होती. दोघ संधीची वाट शोधत होते.
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/08/16145633/New-Project-14.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/08/15213459/Bharatbio-Tech-News.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/08/14212750/Health-2022-08-14T155719.033.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/10/16223216/Bhujbal_Netradaan-compressed.jpg)
संपूर्ण परिसर हादरुन गेला होता
ज्यावेळी संदीप आठवले हा आपल्या भावासोबत शहरातील सिडको परिसरातील शिवाजी चौकात आला. त्यावेळी ओम पवार काही जणांना घेऊन तिथं संदीप आठवलेची वाट पाहत होता. ज्यावेळी संदीप तिथं पोहोचला त्यावेळी त्यांच्यावर ओमच्या मित्रांनी जोरदार केला. ही घटना भरदिवसा पाहायला मिळाली आहे. त्यावेळी संदीपवरती इतका भयानक हल्ला झाला की, संपूर्ण परिसर हादरुन गेला होता. जवळपास २५ वार केले होते. संदीपचा जागीचं मृत्यू झाला.
संदीपला संपवल्यानंतर ओम पवार व्हिडीओत काय म्हणाला
एवढं सगळं झाल्यानंतर ओम पवार शांत बसला नाही. त्याने सोशल मीडियावर त्यांच्या मनात जी काय गोष्ट आहे, ती बोलावून दाखवली. ओम पवार व्हिडीओत म्हणाला की, ‘हे बघ दोन गोळ्या आहेत, जेल तर जेल, लाईव्हला यायचाना तो, ओम्या घाटक्याचे व्हिडीओ लाईव्ह दाखवचा ना तो, हे बघ आता रक्त असं म्हणाला. त्यामध्ये एक आरोपी अल्पवयीन असल्याचं समजंतय.
पोलिस म्हणतात, अशा घटनांची आम्हाला आगोदर माहिती मिळाली, तर त्या आम्ही थांबवू शकतो. ताब्यात घेतलेल्या सगळ्या आरोपींची कसून चौकशी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर इतर गुंडांना सुध्दा सुचना देण्यात येणार आहे.