इगतपुरी – शहरातील सांडपाणी मलनिस्सारण पाणी एकत्रित जमा करून गावाबाहेर असलेल्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रात जमा करण्याच्या पाइपलाइनचे (Pipeline) काम शहरात सुरू आहे. काल पाचआळीतील रिंगरोड (Ringroad) परिसरात असलेल्या अहिल्या नदीतील काम आटोपले. त्यानंतर आपल्या रुटीनच्या पाईप लाईन खोदकामासाठी पोकलेन (poklen) निघाले होते. त्यावेळी मैदानात खेळत असलेल्या एका चिमुकल्याला पोकलेनचा धक्का लागला. तात्काळ ही माहिती परिसरात पसरली. लोकांनी चिमुकल्याला जवळच्या रूग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी चिमुकल्याला मृत घोषित केले. भरत (अखिल) योगेश गमे असं मृत झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे. अपघात झाल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलकेन चालक फरार झाला आहे.
काम आटोपून कायमच्या कामावर निघालेल्या पोकलेनने खेळत असलेल्या चिमुरड्याला चिरडले. ही बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली. त्यानंतर घटनास्थळी अनेक नागरिक जमा झाले. चिमुरड्याला तात्काळ देवस्थानच्या रुग्णवाहिकेतून नाशिक येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मृत घोषित केले. तो पर्यंत पोकलेन चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे. अद्याप पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. परंतु घटनास्थळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणुन त्र्यंबकेश्वर पोलीस परिसरात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.