महिलेचा अनेक तरुणांशी विवाह, पोलिसांनी सांगितलं कारण
Nashik Crime News : नाशिकच्या जिल्ह्यातील मालेगावमध्ये अनेक तरुणांची फसवणूक झाल्याची तक्रार तालुका पोलिसांकडे आली आहे. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर नागिरकांना आवाहन केलं आहे.
मनोहर शेवाळे, मालेगाव : नाशिक (Nashik Malegaon) जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात एक भयानक प्रकरण उजेडात आलं आहे. ज्यावेळी हा प्रकार पोलिसांच्या कानावर पडला, त्यावेळी पोलिसांनी नागरिकांशी (Malegaon Police) संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे. त्या महिलेने अनेकांची फसवणूक केली आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. चार महिला फरार असल्याची माहिती पोलिसांनी (Crime News) सांगितली आहे. त्याचबरोबर त्या महिलांचा शोध घेण्यासाठी एक पथक तयार करण्यात आलं आहे. त्या महिलांना ताब्यात घेतल्यानंतर अनेक प्रकरण उजेडात येतील.
महाराष्ट्रात लग्नाच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केली जात असल्याची अनेक प्रकरण उजेडात आली आहेत. लोकांची एक मोठी टोळी असल्यामुळे असे प्रकार घडत आहेत. मालेगाव मधील प्रकरणात महिला एजेंट फरार आहे. एकूण चार महिला फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
लग्न केल्यानंतर त्या महिला तिथून पळ काढतात. सध्या पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. त्या महिलेने मालेगाव तालुक्यात दोन लग्न केली आहे. एकाचं तालुक्यात दोन लग्न केली असल्यामुळे हा प्रकार उजेडात आला आहे. लग्न केल्यानंतर रोकड आणि दागिने घेऊन पसार व्हायच्या.
या टोळीतील महिलांकडे डुप्लीकेट आधारकार्ड आहेत. त्याचबरोबर या महिला लोकांना गंडवण्यात अधिक माहिर आहेत. मालेगाव तालुक्यात असे अनेक प्रकार घडले असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ज्यांच्यासोबत असा प्रकार घडला आहे. त्यांनी पोलिसांनी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे.
एप्रिल महिन्यात ताब्यात घेतलेल्या महिलेनं पैशासाठी आणि दागिण्यासाठी लग्न केलं होत. सगळी टोळी ताब्यात घेण्यासाठी एक पथक तयार करण्यात आलं आहे. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर आणखी गोष्टी उजेडात येतील.