CRIME STORY :मालेगावात हातात तलवारी घेऊन टोळक्यांचा दहशत पसरवण्याचा प्रयत्न, सीसीटिव्हीत घटना कैद
ज्या व्यक्तीला टोळी शोधण्यासाठी आली होती, ती व्यक्ती त्या परिसरात न भेटल्यामुळे मोठा अनर्थ टळला असल्याचं लोकं सांगत आहेत. पोलिसांची गस्त असताना सुद्धा टोळ्या बिनधास्त फिरत आहेत. कुणाचाही वचक राहिलेला नाही.
मनोहर शेवाळे, नाशिक : मालेगाव शहरातील (Malegaon) आझाद नगर भागात (azad nagar area) एका टोळक्याने हातात तलवारी व शस्त्रे घेऊन दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना मागील आठवड्यातील असून त्या घटनेचे CCTV फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. शहरात सर्वत्र पोलीस रात्र गस्त घालत असताना मध्यरात्री खुलेआम शस्त्रे घेऊन फिरणारी टोळी पोलिसांना नजरेस पडत नसावे हेही एक आश्चर्य आहे. तलवारी घेऊन टोळके ज्या व्यक्तीचा शोध घेत होते, त्याचा शोध त्यांना लागला असता, तर मोठा अनर्थ घडला असता. त्यामुळं शहरातील सतत होणाऱ्या घरफोड्या, वाहन चोऱ्या थांबतांना दिसत नसल्यामुळे पोलिसाच्या (police) रात्री गस्तची फायदा काय असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे.
नाशिक जिल्ह्यात क्राईमच्या घटनात अधिक वाढ झाली आहे. रोज नवी प्रकरणं उजेडात येत आहेत. मालेगाव शहरात काही टोळकी रात्री हत्यारं घेऊन फिरत आहेत. त्यामुळे शहरात त्यांची मोठी दहशत आहे. आझाद नगर भागात एका टोळक्याने हातात तलवारी व शस्त्रे घेऊन दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला, तो सगळा प्रकार CCTV मध्ये दिसला आहे.
ज्या व्यक्तीला टोळी शोधण्यासाठी आली होती, ती व्यक्ती त्या परिसरात न भेटल्यामुळे मोठा अनर्थ टळला असल्याचं लोकं सांगत आहेत. पोलिसांची गस्त असताना सुद्धा टोळ्या बिनधास्त फिरत आहेत. कुणाचाही वचक राहिलेला नाही.