Nashik | थकबाकीपोटी वीज तोडली, पठ्ठ्यांनी आकडे टाकले, 9 जणांवर महावितरणची काय कारवाई?

महावितरणतर्फे सध्या नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात वीजबिलांच्या थकबाकीची वसुली मोहीम जोमाने सुरू आहे. थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा या मोहिमेत खंडित केला जात आहे.

Nashik | थकबाकीपोटी वीज तोडली, पठ्ठ्यांनी आकडे टाकले, 9 जणांवर महावितरणची काय कारवाई?
प्रातिनिधिक छायाचित्र.
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 5:26 PM

नाशिकः वीजबिलाच्या (electricity bill) थकबाकीपोटी महावितरणने वीजपुरवठा खंडित केलेला असतानाही आकडे टाकून चोरीची वीज वापरणाऱ्या 9 इसमांवर शिरपूर (जि. धुळे) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणतर्फे सध्या नाशिकसह (Nashik) उत्तर महाराष्ट्रात वीजबिलांच्या थकबाकीची वसुली मोहीम जोमाने सुरू आहे. थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा या मोहिमेत खंडित केला जात आहे. तसेच वीजपुरवठा खंडित केलेला असतानाही कुणी अनधिकृतपणे वीज वापरत आहे का, याची पडताळणी करण्याचे निर्देश महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयाचे प्रभारी सहव्यवस्थापकीय संचालक प्रसाद रेशमे यांनी सर्व अभियंते व कर्मचाऱ्यांना दिलेले आहेत. त्यानुसार जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे (Dhule) जिल्ह्यातही अधीक्षक अभियंता पंकज तगलपल्लेवार यांच्या पुढाकाराने अशी पडताळणी करण्यात येत आहे.

कोणावर गुन्हा दाखल?

मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंत्यांनी स्वतः मोहिमेत भाग घेऊन दोंडाईचा व इतर भागात पडताळणी केली. प्रादेशिक कार्यालयाची पथकेही या मोहिमेत सामील झाली आहेत. याच पथकातील उपमहाव्यवस्थापक योगेश खैरनार व उपकार्यकारी अभियंता पाटील यांनी तऱ्हाड कसबे येथे भेट दिली असता काही ग्राहक आकडे टाकून वीज चोरी करताना आढळून आले. विशेष म्हणजे महिनाभरापूर्वी या ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीपोटी कायमस्वरूपी खंडित करण्यात आलेला आहे. या प्रकरणी महावितरणच्या वरूळ कक्षाचे सहायक अभियंता दिनेश माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर पोलीस ठाण्यात पुंडलिक गोपीचंद पाटील, नाना पौलाद गिरासे, दिलीप सीताराम पाटील, भटू बळीराम कोळी, जगदीश देविदास सावळे, रमेश दंगल कोळी, संतोष भटू कोळी, दिलीप उत्तम मराठे व योगेश निंबा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सव्वाआठ कोटींची थकबाकी

खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांतील विविध कोविड रुग्णालयांकडे 8 कोटी 26 लाख रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. महावितरणने वारंवार पाठपुरावा करूनही या रुग्णालयांनी थकबाकी भरलेली नाही. कोविडच्या संकटातही महावितरणने नागरिकांसह सर्व रुग्णालये व अत्यावश्यक सेवांना अखंडित वीजपुरवठा केला. यात कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या शासकीय व खासगी रुग्णालयांचाही समावेश आहे. तेथे वीजपुरवठा खंडित होणार नाही याची महावितरणने पूर्णपणे काळजी घेतली. त्यामुळे वीजपुरवठा खंडित न करता थकबाकी भरण्यासाठी संबंधित रुग्णालयांच्या प्रशासनाकडे महावितरण वारंवार पाठपुरावा करत आहे. मात्र, रुग्णालयांनी बिलांची थकबाकी भरलेली नाही. आता ती वसुली कशी करायची असा प्रश्न महावितरणपुढे उभा ठाकला आहे.

या रुग्णालयांकडे थकबाकी

जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील दोन वीजजोडण्यांची 1 कोटी 66 लाख 42 हजार 640 रुपये थकबाकी आहे. तर जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे 10 लाख 75 हजार 848 रुपयांचे वीजबिल थकीत आहे. तर गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाकडे तब्बल 4 कोटी 66 लाख 36 हजार 223 रुपयांचे वीजबिल थकीत आहे. धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाकडे 83 लाख 80 हजार 887 रुपये तर शिरपूर येथील शासकीय रुग्णालयाकडे 12 लाख 67 हजार 76 रुपये वीजबिल थकले आहे. नंदुरबार येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे 61 लाख 43 हजार 324 रुपये वीजबिल थकीत आहे.

महावितरण कंपनीची आर्थिक स्थिती बिकट असून, थकबाकी वसूल करण्याखेरीज दुसरा पर्याय उरलेला नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात थकबाकी ठेवणे शक्य नसल्याने आपल्या स्तरावर योग्य तो पाठपुरावा करून थकबाकी भरण्याची व्यवस्था करावी. अन्यथा कंपनी नियमाप्रमाणे कार्यवाही करू.

– कैलास हुमणे, मुख्य अभियंता

इतर बातम्याः

Nivruttinath | 800 वर्षांपूर्वी संजीवन समाधी, यशापासून निवृत्ती, ज्ञानेश्वर माऊलींचे गुरू; संत निवृत्तीनाथांची यात्रोत्सवानिमित्त अनोखी ओळख!

Wine Capital Nashik | नाशिक वाईन कॅपिटल कसे झाले; ऐतिहासिक ‘पिंपेन’ची कशी झाली सुरुवात?

Nashik | नाशिक क्लायमेट ॲक्शन प्लॅन सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या, काय होणार लाभ?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.