वृक्षांच्या मुळावर कोण उठलंय? जिवंत झाडांना कोण मारतंय? पालिकेकडून 17 गुन्हे दाखल झाल्याने खळबळ
नाशिक महानगर पालिकेच्या पथकाने 17 जणांवर वृक्षतोड केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली असून वृक्षतोड करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
नाशिक : नाशिक शहरात वृक्षांच्या जिवावर कोण उठलंय ? असा संतप्त सवाल उपस्थित होऊ लागला आहे. खरंतर गेल्या काही महिन्यांपासून शहरात अनधिकृत पद्धतीने वृक्षतोड केली जात होती. त्याबाबतच्या काही तक्रारी पालिकेकडे करण्यात आल्या होत्या. त्यानुसार पालिकेच्या वन विभागाने एक विशेष मोहीम हाती घेतली होत्या. त्यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे विविध पोलिस ठाण्यात पालिकेने 17 गुन्हे दाखल केले असून लाखों रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे शहरातील वृक्षप्रेमी आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झाली असून पालिकेच्या कारवाईनंतर वृक्षाची कत्तल करणारे गुन्हेगार कोण आहेत असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नाशिक महानगर पालिकेच्या माध्यमातून शहर हद्दीत नुकतीच वृक्षतोडीच्या संदर्भात कारवाई केली आहे. त्यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे एकूण 17 गुन्हे दाखल केले असून जवळपास 24 लाख रुपयांचा दंड आकारला आहे.
नाशिक महानगर पालिकेच्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेली ही कारवाई धक्कादायक आहे. शहरात सर्रासपने वृक्षतोड करणारे कोण आहे? यांसह वृक्षतोड कशासाठी करण्यात आली ? याबाबत आता विचारणा होऊ लागली आहे.
नाशिक महानगर पालिकेच्या एकूण सहा विभागात ही कारवाई करण्यात आली असून यामध्ये सर्वाधिक कमी फक्त एकच गुन्हा पंचवटी विभागात करण्यात आली आहे. तर सर्वात जास्त वृक्षतोड पश्चिम विभागात करण्यात आली आहे एकूण सहा गुन्हे दाखल आहे.
12 मार्चच्या दरम्यान सातपुर परिसरात वृक्षतोड करून लाकूड वाहणाऱ्या टोळीला पालिकेच्या पथकाने पकडले होते. त्यावरून शहारात ही राबवली होती. त्यावरून दोन टनाहून अधिक वजनाचा लाकूडफाटा जप्त केला होता.
नाशिक शहरात पालिकेच्या वतीने राबवलेली ही मोहीम कायम राबवावी अशी मागणी होऊ लागली आहे. वृक्षप्रेमीयाबाबत आता मागणी करत असून झाडांची हत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहे.