भूमी अभिलेख कार्यालयात काय चाललंय? महिनाभरात तिसरी मोठी कारवाई? कोण कुणाचं उष्ट पाणी प्यायलं? चर्चा काय ?
महिनाभारत सहा ते सात अधिकारी कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकले आहे. विशेष म्हणजे लाच घेतांना रंगेहात अटक केली आहे. त्यात विशेष म्हणजे नाशिक विभागाचा वरिष्ठ अधिकारी सुद्धा लाच घेतांना अडकला होता.
नाशिक : नाशिकच्या भूमीअभिलेख विभागाला नेमकं झालंय तरी काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. नाशिक च्या भूमीअभिलेख अधिकारी कर्मचाऱ्यांवर तिसऱ्यांदा कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये नुकतीच एक कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये तिघांना लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ( ACB Raid ) अटक केली आहे. या कारवाईमुले संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वीही महिनाभरात दोन मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहे. यामध्ये विशेष बाब म्हणजे वर्ग एकचा अधिकारी सुद्धा लाच घेतांना रंगेहात पकडला गेला होता. त्यामुळे संपूर्ण भूमीअभिलेख विभागाला लाच घेण्याची सवय लागलीय का? अशी चर्चा नाशिकमध्ये सुरू झाली आहे.
खरं म्हणजे नाशिकच्या भूमीअभिअभिलेख विभागातील तिघांवर लाच मागीतल्या प्रकरणी अटक करण्यात आली असून त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यावर जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
महिनाभारत सहा ते सात अधिकारी कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहे. विशेष म्हणजे लाच घेतांना रंगेहात अटक केली आहे. त्यात विशेष म्हणजे नाशिक विभागाचा अधिक्षक सुद्धा लाच घेतांना अडकला होता.
त्यामुळे भूमीअभिलेखच्या अधिकाऱ्याचं कर्मचारी उष्ट पाणी प्यायले होते का? की कार्यालयाचा दोष आहे? अशी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे भूमीअभिलेख कार्यालयात म्हणजे लाचखोरीचं माहेरघरं झाल्याचा अनुभव नाशिककरांना येऊ लागला आहे.
नुकतेच त्र्यंबकेशर येथे जे प्रकरण समोर आले आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांची सर्रासपणे कशी लूट केली जाते याचे उदाहरण समोर आले आहे. महिनाभारत तिसऱ्यांदा कारवाई आणि त्यात एकच लाच घेण्याचा पॅटर्न असल्याने खळबळ उडाली आहे.
शिरस्तेदार दौलत समशेर आणि भूकरमापक भास्कर राऊत यांनी खासगी एजंटच्या माध्यमातून सहा लाखांची मागणी केली होती. त्यानुसार दोन्ही अधिकाऱ्यांसह एजंटला अटक करण्यात आली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर पोलिस अधीक्षक नारायण न्याहळदे, पोलिस निरीक्षक गायत्री जाधव यांच्यासह पथकाने ही कारवाई केली आहे. या कारवाईची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.