Nashik Crime : वडिलांशी वाद घातला म्हणून जाब विचारला, तरूणांनी थेट त्याला….

या घटनेनंतर फरार झालेल्या संशयितांपैकी चौघा जणांना पंचवटी पोलिस ठाण्याच्या गुन्हा शोध पथकाकडून कसबे सुकेणे येथून ताब्यात घेत अटक करण्यात आली.

Nashik Crime : वडिलांशी वाद घातला म्हणून जाब विचारला, तरूणांनी थेट त्याला....
Follow us
| Updated on: Oct 14, 2023 | 10:35 AM

मुंबई | 14 ऑक्टोबर 2023 : नाशिक शहरात गुन्ह्यांच्या (crime in nashik) वाढत्या घटनांमुळे नागरिक प्रचंड धास्तावले आहेत. कधी चोरी, दरोडा, खंडणी, लूटमारीच्या घटना सुरूच आहेत. त्यामध्ये तरूण गुन्हेगारांचाही वाढता समावेश आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अवघ्या छोट्या मोठ्या कारणांवरूनही वाद होऊन लोकं एकमेकांच्या जीवावर उठत आहेत. अशीच एक घटना नाशिकमध्ये नुकतीच उघडकीस आला आहे.

वडिलांशी वाद घातल्याच्या शुल्लक कारणावरून कुरापत काढत एका युवकाचा काही आरोपींनी जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या मखमलाबाद रोडवरील गुंजाळ मळा परिसरात हा प्रकार घडला आहे. आरोपी तरूणांनी रागाच्या भरात धारदार चॉपरने वार केल्याने तरूणाचा घटनास्थळी मृत्यू झाला. या घटनेनंतर फरार झालेल्या संशयितांपैकी चौघा जणांना पोलिसांनी अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे.

तिथे काय घडलं ?

सागर शिंदे असे मृत तरूणाचे नाव आहे. क्रांती नगर परिसरात राहणाऱ्या सागरचे त्याच परिसरात राहणाऱ्या केदार इंगळे या तरूणाच्या वडिलांशी काही मुद्यावरून भांडण झाले होते. भांडणादरम्यान सागरने केदारच्या वडिलांना शिवीगाळ केली होती. काल सागर शिंदे हा त्याच्या मित्रांसोबत गप्पा मारत बसलेला असताना, केदार इंगळे व त्याचे काही साथीदार कारमधून तर काही जण बाईकवरून तेथे आले. वडिलांना शिवीगाळ का केली असा जाब विचारत केदारने सागरशी वाद घालण्यास सुरूवात केली. त्याचे इतर साथीदारही त्याच्याशी भांडू लागले. त्याचवेळी संशयित इंगळे आणि इतरांनी रागाच्या भरात सागरवर धारदार चॉपरने सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सागरचा जागेवरच मृत्यू झाला.

हल्ल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पंचवटी पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. या घटनेतील सहा पैकी चार संशयितांना आरोपींना पंचवटी पोलिस ठाण्याच्या गुन्हा शोध पथकाने कसबे सुकेणे येथून ताब्यात घेत अटक केली. इतर दोघे अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

Viral Girl कुंभमेळ्यात प्रसिद्ध झालेल्या मोनालिसाला चाहत्यांचा त्रास
Viral Girl कुंभमेळ्यात प्रसिद्ध झालेल्या मोनालिसाला चाहत्यांचा त्रास.
सैफ सुखरूप पण हल्लेखोरानं पुन्हा उडवली झोप, चौकशीतून धक्कादायक माहिती
सैफ सुखरूप पण हल्लेखोरानं पुन्हा उडवली झोप, चौकशीतून धक्कादायक माहिती.
'आका'सह सरपंच हत्येची टोळी अन् पोलीसही सीसीटीव्हीत कैद, धस आक्रमक
'आका'सह सरपंच हत्येची टोळी अन् पोलीसही सीसीटीव्हीत कैद, धस आक्रमक.
महायुतीत पालकमंत्रीपदावरुन धुसफूस, शिवसेना अन् राष्ट्रवादीत खटके
महायुतीत पालकमंत्रीपदावरुन धुसफूस, शिवसेना अन् राष्ट्रवादीत खटके.
अखेर डिस्चार्ज अन् सैफ पहिल्यांदाच आपल्या चाहत्यांसमोर...बघा VIDEO
अखेर डिस्चार्ज अन् सैफ पहिल्यांदाच आपल्या चाहत्यांसमोर...बघा VIDEO.
पालकमंत्रीपद वाटपावरून आता राष्ट्रवादीत धुसफूस, दादांचे मंत्री नाराज
पालकमंत्रीपद वाटपावरून आता राष्ट्रवादीत धुसफूस, दादांचे मंत्री नाराज.
गुलाबी शाल, बुके अन्..दादांकडे बीडच पालकमंत्रीपद, पंकजाताईकडून अभिनंदन
गुलाबी शाल, बुके अन्..दादांकडे बीडच पालकमंत्रीपद, पंकजाताईकडून अभिनंदन.
सैफ आता सेफ! चाकू हल्ल्यानंतर अभिनेत्याला 6 दिवस उपचारानंतर डिस्चार्ज
सैफ आता सेफ! चाकू हल्ल्यानंतर अभिनेत्याला 6 दिवस उपचारानंतर डिस्चार्ज.
BEED : खंडणीची मागणी, तो CCTVपाहिला? कराडसह सर्व आरोपी एका फ्रेममध्ये
BEED : खंडणीची मागणी, तो CCTVपाहिला? कराडसह सर्व आरोपी एका फ्रेममध्ये.
बीडमध्ये चालंलय काय? मुलीचा HIV ने मृत्यू झाल्याची अफवा अन्...
बीडमध्ये चालंलय काय? मुलीचा HIV ने मृत्यू झाल्याची अफवा अन्....