लाखो रुपयांचा माल एका फोनवर पाठवला, तीन वर्षे वायद्याच्या पलीकडे काहीच मिळालं नाही, अखेर ठकसेन व्यापऱ्याच्या…

परराज्यातील अनेक ठकसेन व्यापारी शेतकऱ्यांना चुना लावून फरार होतात. मात्र, आता व्यापाऱ्यांनाही चुना लावून परराज्यातील व्यापारी फरार होत असल्याचे समोर आले असून नुकताच एक नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

लाखो रुपयांचा माल एका फोनवर पाठवला, तीन वर्षे वायद्याच्या पलीकडे काहीच मिळालं नाही, अखेर ठकसेन व्यापऱ्याच्या...
तीन महिन्यापुर्वी दुसरं लग्नImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Apr 27, 2023 | 5:28 PM

नाशिक : नाशिक मधील शेतकऱ्यांना परराज्यातील व्यापारी जसा गंडा घालतात तसाच गंडा व्यापाऱ्यांनाही घातला जात आहे. नाशिक बाजार समितीतील फसवणुकीची घटना ताजी असतांनाच सिन्नरमध्ये एका कांदा व्यापाऱ्याची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे ही फसवणूक तीन वर्षांपूर्वी झाली होती. खरंतर या फसवणुकीच्या संबंधी सिन्नर पोलिस ठाण्यात फसवणूक झालेल्या व्यापऱ्याने तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल 25 टन कांदा पाठवल्यानंतर तीन वर्षे पैसे मिळतील या आशेवर राहिलेल्या उत्तम पालवे यांनी पोलिसांत धाव घेतली होती. जवळपास उत्तम पालवे यांची हरियाणा येथील गुडगाव येथील कृष्णा कौशिक या व्यापऱ्याने सव्वापाच लाखांची फसवणूक केली आहे.

नाशिकच्या सिन्नर येथील बाजार समितीत व्यापारी असलेले उत्तम पालवे यांची सव्वा पाच लाखांची फसवणूक झाली आहे. त्यांनी तब्बल 25 टन कांदा हरियाणा येथील गुडगाव मधील कृष्णा कौशिक या व्यापाऱ्याकडे विक्रीसाठी पाठविला होता.

उत्तम पालवे यांनी 50 किलोच्या गोणीप्रमाणे 528 गोणी म्हणजेच 25 टन 413 किलो कांदा पाठविला होता. कृष्णा कौशिक याने कांदा मिळाल्याचे कळविले होते. मात्र, पैसे देण्यास नंतर टाळाटाळ केली. उत्तम पालवे याने वारंवार फोन करून पैशाची मागणी केली होती.

हे सुद्धा वाचा

कृष्णा कौशिक हा व्यापारी पालवे यांना तारखा देत गेला. आज देतो उद्या देतो म्हणून वायदे देत गेला. पालवे यांनी पैशाचा तब्बल तीन वर्षे तगादा लावला. मात्र, कृष्णा कौशिक याने पैसे न दिल्याने वैतागून उत्तम पालवे याने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली आहे.

सिन्नर पोलिस ठाण्यात कृष्णा कौशिक याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी कृष्णा कौशिक हा खांडसा गुडगाव हरियाणा येथील रहिवाशी आहे. ठकबाजीचा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला असून सिन्नर पोलिस अधिकचा तपास करीत आहे.

'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर.
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?.