झोपण्यापूर्वी कल्पना सुद्धा केली नसेल, दुर्दैवी घटनेनं सर्वत्र हळहळ, तीन वर्षांचा मुलगा साखर झोपेत असतानाच…

खरंतर लहान मुलं घरात असतील तर त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विशेष काळजी घेण्याचे आवाहन वारंवार करण्याची वेळ येत आहे. नाशिकच्या अंबड परिसरात अशीच एक घटना घडली असून त्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

झोपण्यापूर्वी कल्पना सुद्धा केली नसेल, दुर्दैवी घटनेनं सर्वत्र हळहळ, तीन वर्षांचा मुलगा साखर झोपेत असतानाच...
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Apr 27, 2023 | 11:24 AM

चैतन्य गायकवाड, टीव्ही 9 मराठी, नाशिक : कधी कधी अशा काही घटना घडत असतात की माणूस त्यामुळे निशब्द होऊन जातो. त्याला व्यक्त होणं देखील अवघड होऊन जातं. अशीच काहीशी घटना नाशिकच्या अंबड परिसरात घडली आहे. घटना ऐकून तुम्हाला असे वाटेल की हे दुश्मनाच्या घरात सुद्धा घडायला नको. अंबड परिसरातील जाधव संकुल परिसरात विश्वकर्मा कुटुंब राहतं. त्याच घरात तीन वर्षीय शौर्य नावाचा मुलगा होता. हा मुलगा गाड झोपेत असतांना त्याच्या अंगावर बाजूला असलेले लाकडी कपात पडले होते. उपचार करण्याची वेळ सुद्धा आली नाही, त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. खरंतर ही घटना घडताच शौर्यला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यापूर्वीच डॉक्टरांनी तपासून मृत असल्याचे घोषित केले.

तीन वर्षीय मुलाचा झोपेत असतांनाच दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. लाकडी कपाट हे अधिक वाजनाचे होते. त्यात पडता क्षणीच होत्याचं नव्हतं झालं. त्यामुळे उपचारासाठी कुठलीही संधी राहिली नव्हती.

नाशिकच्या अंबड परीसारतील जाधव संकुल येथे राहणाऱ्या विश्वकर्मा कुटुंबात ही घटना घडली आहे. अगदी लाडात वाढलेल्या शौर्याचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहे.

हे सुद्धा वाचा

खरंतर घरात लहान मुलं असो वा इतर कोणीही झोपेत असतांना आजूबाजूला अंगावर पडेल अशी कुठली वस्तु नाही ना याची खात्री करणे गरजेचे आहे. यापूर्वी अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. त्यामध्ये विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

या घटनेने अंबड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. पंचनामा करून आकस्मित मृत्यूची नोंद केली असून अधिकचा तपास केला जात आहे. मात्र, घडलेली दुर्दैवी घटना पाहता निष्पाप बळी गेल्यानं अनेकांचे डोळे पाण्याने भरून येत आहे.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.