केक घ्यायचा होता पण पैसे नव्हते, तरुणाने लढवलेली शक्कल पाहून तुम्हाला धक्काच बसेल, Video पाहा…
केक घेण्यासाठी गेलेल्या टोळक्याने नाशिकमध्ये जे काही केलं आहे त्याने संपूर्ण गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नाशिक : नाशिक शहरात पुण्यातील कोयता गॅंगचा पॅटर्न चांगलाच गुन्हेगारांनी मनावर घेतला आहे. पंचवटी, सिडको आणि आता सातपुरमध्ये कोयत्याचा वापर गुन्हेगारांकडून गेल्याचे निदर्शनास आले आहे. सिडको परिसरातील कोयता गॅंगचे लोन सातपूर पर्यन्त पोहचले आहे. दुकानात केक घेण्यासाठी गेलेल्या तरुणांनी केकचे पैसे मागितले म्हणून राडा केला आहे. पैसे मागितल्याचा राग आल्याने टोळक्याने दुकानाच्या मालकावर थेट कोयता उगारल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोयता उगारून परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न यावेळी झाला ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.
सातपुरच्या शिवाजीनगर परिसरातील बेकरीमध्ये केक घेण्यासाठी गेलेल्या टोळक्याने पैसे देण्याच्या कारणातून दुकानदाराशी वाद घातला बेकरीत आरडाओरडचा आवाज आल्याने बेकरीतील कर्मचारी जमले होते.
केकवरून दुकान मालकाने पैसे मागितले होते त्यावरून बाचाबाची झाली होती. शिवीगाळ करत टोळके बाहेर पडले. त्यामध्ये बाहेर निघाल्याने टोळक्याने दुकानावर दगडफेक केली होती.
दुकानावर दगडफेक कुणी केली म्हणून बाहेर पाहण्यासाठी आलेल्या बेकरीच्या मालकावर टोळक्यातील एकाने कोयता उगारला होता. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले पोलिसांकडे कारवाईची मागणी होत आहे.
केक वरून सातपूरमध्ये राडा, टोळक्यानं उगारला कोयता… #nashiknews #nashikpolice pic.twitter.com/66bobsmzcW
— Kiran Balasaheb Tajne (@kirantajne) March 27, 2023
पोलिसांनी या टवाळाखोरांचा बंदोबस्त करावा तसेच कोयता गॅंग वर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. सातपुर पोलिसांनी संशयतांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सातपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी करीत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील कोयता गॅंगचे लोण नाशिक शहरात देखील पसरले आहे. त्यामध्ये नाशिक शहर पोलिसांची चांगलीच डोकेदुखी वाढली असून शहारातील कोयता गॅंगची दहशत मोडून काढण्याचे आवाहन पोलिसांसमोर उभे राहिले आहे.